Dharashiv News: देशातील पहिला खासगी साखर कारखाना असलेल्या रांजणी (ता. कळंब) येथील नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजमधील सर्व वजनकाटे बरोबर आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार साखर कारखान्यातील सर्व वजनकाट्याची तपासणी कळंबचे तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने शुक्रवारी (ता. २०) केली व काटे तंतोतंत असल्याचा निर्वाळा दिला. लोखंडी वजनमापे ठेवून दोन वेळा केलेल्या काट्याच्या तपासणीनंतर काहीच तफावत नसल्याचे भरारी पथकाने स्पष्ट केले..पथकामध्ये वैधमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक वै. वि. स्वामी, शिराढोणचे सहायक पोलिस निरीक्षक डी. बी. कोळेकर, लेखा परीक्षक श्रेणी एक (साखर) के. एस. बोंदर व सहायक निबंधक (सहकारी संस्था) कार्यालयातील वरिष्ठ लिपिक के. एस. टेळे व शेतकरी प्रतिनिधींचा पथकात समावेश होता. .Weighbridge Inspection: कारखान्यांच्या वजनकाट्यांची, ‘भरारी पथका’कडून तपासणी.या वेळी कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व वाहनचालक उपस्थित होते. भरारी पथकाने वजनकाटे पुन्हा पुन्हा वजन मापे ठेवून व वाहनांचे दुबार वजन करून तपासणी केली. त्यात वजनामध्ये कोणताही फरक असल्याचे संबंधित पथकाला व उपस्थित प्रतिनिधींना आढळले नाही..Ration Card Verification: रेशनचे पावणेदोन लाख संशयित लाभार्थी रडारवर!.शेतकऱ्यांकडून पुरवठा केलेल्या उसाच्या वजनात फाटा मारला जात असल्याचे आरोप होत असताना सरकारने पथकांमार्फत राज्यातील सर्वच साखर कारखान्यातील वजनकाट्यांची तपासणी सुरू केली आहे. शुक्रवारी नॅचरल शुगरमध्ये झालेल्या तपासणीनंतर शेतकऱ्यांचा कारखान्यावरील विश्वास पुन्हा वाढला आहे. .हा शेतकऱ्याच्या मालकीचा कारखाना आहे. कारखान्यामध्ये बेकायदा, नियमबाह्य व अनाधिकृत अशी कोणतीच गोष्ट केली जात नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठीच प्रामाणिकपणे कार्यरत राहिलो व यापुढेही राहणार आहोत. यामुळे कारखान्याचे वजन काटे व कोणत्याही व्यवहारात कधीच चुकीचे काही दिसून येणार नाही, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी यानिमित्ताने व्यक्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.