Pending Loan Waiver: राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत असताना कर्जमाफीच्या प्रतीक्षेने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. कर्जमाफीच्या आतापर्यंत दोन याद्या जाहीर झाल्या असून, अद्यापही अनेक पात्र शेतकऱ्यांची नावे यादीत आलेली नाहीत. त्यामुळे शासनाने कर्जमाफीची तिसरी यादी तातडीने जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. .कर्जमाफीची पहिली यादी २४ जुलैला, तर दुसरी यादी १० सप्टेंबरला जाहीर झाली. पहिल्या यादीच्या तुलनेत दुसऱ्या यादीत पात्र शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र असूनही यादीत नाव न आलेले शेतकरी आता तिसऱ्या यादीच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरी यादी जाहीर होऊन १९ दिवस उलटले तरी पुढील यादीबाबत स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे..Farmer Loan Waiver : कर्जमाफीच्या रकमेतील तफावत का? 'हेअरकट'वर कृषिमंत्र्यांचा खुलासा.यंदा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. खरीप हंगामात सोयाबीन आणि कपाशी पिकांना पावसाच्या खंडाचा फटका बसल्याने अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी आहे. खरीप पिकांच्या उत्पादनावरच शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम अवलंबून असतो. त्यामुळे रब्बीची तयारी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे..Farmer Loan Waiver: कर्जमाफीतील तफावतीने शेतकरी साशंक; ‘सिबिल’बाबत सवाल.कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून नवीन पीककर्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्याबाबत अपेक्षित हालचाल अद्याप दिसून येत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. कर्जमाफीच्या याद्या वेळेत जाहीर झाल्यास पात्र शेतकऱ्यांचा नवीन कर्जाचा मार्ग मोकळा होऊन रब्बी हंगामाची आर्थिक व्यवस्था करता येऊ शकते..जाहीर झालेल्या याद्यांमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. तुलनेत राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जदार शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बँकांकडून कर्जखात्यांची अचूक माहिती संबंधित विभागाला पाठविल्यास पात्र शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत समाविष्ट होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांनीही या बाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.