ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेची २४ वी ऊस परिषद १६ ॲाक्टोबरलाया परिषदेत ऊस दर आंदोलनाची दिशा ठरणार उसाची पहिली उचल किती असावी? यावर चर्चा होणार.Swabhimani Sugarcane Parishad : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २४ व्या ऊस परिषदेची तारीख ठरली आहे. ही परिषद जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रिडांगणावर १६ ॲाक्टोबर रोजी होईल, अशी माहिती 'स्वाभिमानी'चे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली. जयसिंगपूर येथे कल्पवृक्ष गार्डन येथील कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी ऊस परिषदेची तारीख जाहीर केली. .या परिषदेत ऊस दर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. तसेच उसाची पहिली उचल किती असावी?, उसाच्या उत्पादन खर्चावर चर्चा होईल. ऊस उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी ठराव मांडले जातील. हे ठराव केंद्र आणि राज्य सरकारला पाठवले जातील, असे 'स्वाभिमानी'कडून सांगण्यात आले आहे..Sugarcane Crushing Season: ऊस गाळप हंगामाची तारीख २९ सप्टेंबरला जाहीर होणार .यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत ऊसदर एफआरपीमध्ये वाढ झाली. पण शेतकऱ्यांना वाढीव एफआरपीचा कोणताही फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. खते , बि-बियाणे, कीडनाशके, मजूरी, मशागत आणि तोडणी- वाहतूक खर्च वाढला आहे. केंद्र आणि राज्य सरकार साखर उद्योगाकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे साखरेसह उपपदार्थांबाबत चुकीचे निर्णय होवू लागले आहेत. .साखर कारखान्यांना अंतराची अट घालून नवीन परवाने देण्याचे बंद करण्यात आले आहे. पण दुसरीकडे याच कारखान्याचे गाळप परवाने तिप्पट, चौपटीने वाढू लागले आहेत. देशातील आणि राज्यातील साखर कारखानदार एकत्रित येवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी एफआरपीमध्ये मोडतोड करण्याचा प्रयत्न करू लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे. .Sugarcane Damage: मुसळधार पावसाने ऊस पीक जमीनदोस्त.राज्यातील साखर संघ आणि राज्य सरकार एकत्रित येवून बेकायदेशीररित्या एकरकमी एफआरपीमध्ये मोडतोड करून ती दोन अथवा तीन टप्प्यांत देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या राज्याच्या उच्च न्यायालयात एकरकमी एफआरपीची लढाई जिंकली आहे. या निर्णयाविरोधात राज्य सरकार आणि राज्य साखर संघ सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायद्याच्या चौकटीत अडकविण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे. .गेल्या पाच वर्षांपासून साखर कारखाने उस उत्पादकांना प्रति टन २,८०० ते ३ हजार रुपयांपर्यंतच दर देवू लागले आहेत. नैसर्गिक आपत्ती, महापूर, अतिवृष्टी यासारख्या संकटाने शेतकरी कोलमडला असल्याचे त्यांनी नमूद केले आहे..'स्वाभिमानी'कडून २४ व्या ऊस परिषदेच्या निमित्ताने सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, उत्तर कर्नाटक येथे शेतकरी मेळावे घेतले जाणार आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.