Shaktipeeth Highway Protest: ‘‘शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी ओरबाडल्या जात असतील, तर आम्ही गप्प बसणार नाही. पोलिसांच्या जोरावर रात्रीच्या अंधारात माता-भगिनींवर हात टाकणाऱ्या अधिकाऱ्यांनी व सरकारने लक्षात ठेवावे, आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही गरजेचा नसलेला शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही,’’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला..प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या सक्तीच्या भूसंपादनासाठी आणि ड्रोन मोजणीसाठी खानापूर तालुक्यातील नागेवाडी, माऊली, भाग्यनगर परिसरात पोलिस प्रशासनाने मंगळवारी (ता. ९) मध्यरात्रीपासून सुरू केलेल्या हुकूमशाही कारवाईच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता.१०) विटा येथील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार कार्यालयावर तीव्र आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात ॲड. दीपक लाड, जिल्हाध्यक्ष संजय बेले, संदीप राजोबा, विश्वास कोळी, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते..Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’ महामार्गात बाधित शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार : जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस .शेट्टी म्हणाले, की मंगळवारी (ता.९) रात्री नागेवाडीत पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दिवसभर कष्ट करून सुप्तावस्थेत असलेल्या शेतकऱ्यांच्या घरात पोलिस प्रशासनाने रात्रीच्या वेळी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. मोजणीस विरोध करणाऱ्या महिलांशी असभ्य व उर्मट वर्तन केले..लोकशाही मार्गाने आपल्या हक्काची सुपीक जमीन वाचवू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक देणाऱ्या या पोलिस यंत्रणा ‘खाकी वर्दीतील दरोडेखोर आणि जनरल डायरची औलाद’ आहे. .Shaktipeeth Highway Protest: खाकी वर्दीची दडपशाही खपवून घेणार नाही, शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी संतप्त, विटा 'तहसील'वर आक्रोश मोर्चा .शासकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या बळावर नागेवाडी येथे ड्रोनद्वारे मोजणी करण्याचा प्रयत्न केला असता, शेतकऱ्यांनी विरोध केला. या वेळी शेतकऱ्यांनी व संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या संघर्षामुळे प्रशासनाला अखेर ड्रोन मोजणी तत्काळ थांबवावी लागली..शेतकरी प्रकल्पासाठी जमिनी देणार नसतील तर जोर जबरदस्तीने संपादन करू नये. शासनास सदर भूसंपादनास विरोध असल्याचा अहवाल द्यावा. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार आहेत, त्या शेतकऱ्यांना पीककर्ज किंवा इतर कर्जे नाकारण्यात येऊ नये, अन्यथा कार्यालयातील खुर्च्या बाहेर काढू. राजू शेट्टी, माजी खासदार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.