Fertilizer Policy Issues: केंद्र सरकारने खत विक्रीत पारदर्शकता आणण्यासाठी अॅग्रीस्टॅक प्रणाली, फार्मर आयडी आणि नवीन ई-पॉस मशिनद्वारे खत विक्री अनिवार्य केली आहे. मात्र, या प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून, ऐन पेरणीच्या हंगामात ऑनलाइन खतविक्रीची सक्ती शिथिल करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे..ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची समस्या, सर्व्हर वारंवार डाऊन होणे आणि बायोमेट्रिक पडताळणीतील अडचणी यामुळे खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. ई-पीक पाहणी किंवा अॅग्रीस्टॅकमधील माहिती अद्ययावत नसल्यास आवश्यक खत मिळत नसल्याची तक्रार आहे. .Farmer Compensation Demand: रिंगरोड भूसंपादनावरून शेतकरी आक्रमक.अनेकदा विक्रेत्यांकडे खतसाठा उपलब्ध असूनही तांत्रिक बिघाडामुळे तो पोर्टलवर दिसत नसल्याने कृत्रिम टंचाई निर्माण होत आहे..Raju Shetti: कर्जमाफीत आकड्यांचा जुगाड, राजू शेट्टींची जोरदार टीका, ७ मुद्दे केले उपस्थित .याशिवाय, काही विक्रेते युरिया व डीएपीसारख्या खतांसोबत इतर विनाअनुदानित उत्पादने खरेदी करण्याची सक्ती करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. वयस्कर, आजारी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही या प्रक्रियेमुळे अडचणी येत आहेत..शासनाने तंत्रज्ञानाचा वापर शेतकरीहिताचा ठेवून पर्यायी व्यवस्था करावी व खतांसोबतची सक्तीची विक्री तात्काळ बंद करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.