Kolhapur News : राज्यात आलेल्या महापूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतीची जमीन खरडून गेली असून पिकांची पूर्णपणे नासाडी झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. इंदापूर येथे श्री. भरणे यांची त्यांनी भेट घेऊन ही मागणी केली..श्री. शेट्टी चार दिवसांपासून मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी नांदेड, धाराशिव, हिंगोली, बुलडाणा यांसह एकूण १९ जिल्ह्यांना या अतिवृष्टीचा मोठा फटका बसल्याचे निदर्शनास आणून दिले. या भागात कापूस, सोयाबीन, उडीद, मका, मूग आणि फळबागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. .Crop Damage : सांगलीत अतिवृष्टी, पुराचा पाच हजार हेक्टरवरील पिकांना फटका.अनेक नद्या आणि ओढ्याकाठच्या शेतातील पिके तर पंचनामे करण्याइतकीही शिल्लक राहिलेली नाहीत. आधीच खते, बियाणे, कीटकनाशके, तणनाशके आणि मजुरीच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. .Crop Damage : भीमेच्या पुराने मंगळवेढ्यात पिकांचे नुकसान.त्यातच केंद्र सरकारच्या आयात-निर्यात धोरणांमधील बदलांमुळे शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी आधीच कर्जबाजारी झाले असून आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. या गंभीर परिस्थितीवर तातडीने लक्ष देऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरसकट नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली..या वेळी सतीश काकडे, पृथ्वीराज जाचक, अमरसिंह कदम, राजेंद्र ढवाण पाटील, अजित बोरकर, धनंजय महामुलकर, नितीन यादव यांच्यासह ‘स्वाभिमानी’चे पदाधिकारी उपस्थित होते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.