शिरोली येथे २०१२ मधील ऊस आंदोलनादरम्यान एका पोलिसाचा मृत्यू झाला होता या गुन्ह्यांतून राजू शेट्टी यांच्यासह ८० जणांची निर्दोष मुक्तताकोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल.Raju Shetti 2012 Kolhapur Sugarcane Protest Case: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथे राष्ट्रीय महामार्गावर २०१२ मध्ये जे ऊस आंदोलन झाले होते; त्यात एका पोलिसाचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यांतून माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्यासह ८० जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. या ऊस आंदोलनाच्या जवळपास १५ वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला आहे. .ऊस आंदोलन प्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्यांत ३०२ सारखा कलमांचा समावेश होता. या गुन्ह्यातून सर्वच्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. यामुळे राजू शेट्टी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. .Sugarcane Rate: ‘स्वाभिमानी’च्या रेट्यामुळेच सांगलीत कारखान्यांकडून ऊसदर जाहीर.शिरोली येथे २०१२ साली ऊस आंदोलनदरम्यान घडलेल्या गुन्ह्याप्रकरणी राजू शेट्टी यांच्यासह ८० जणांची कोल्हापूर सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली. जवळपास १३ वर्षांनी हा निकाल लागल्याने आंदोलनातील शेतकऱ्यांनी न्यायालयाच्या आवारातच एकमेकांची गळाभेट घेत आनंद व्यक्त केला. .Kolhapur Sugarcane Price Protest: 'ओलम'कडून ३,५०० रूपये पहिली उचल जाहीर, 'स्वाभिमानी'च्या आंदोलनाला यश, कारखाना सुरु.यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, शेतकरी आंदोलने करत असताना आंदोलन दडपण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने पोलिस प्रशासनास हाताशी धरून जाणीवपूर्वक हा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्याने चळवळीमध्ये लढण्यासाठी कार्यकर्त्यांना पुन्हा बारा हत्तीचे बळ आले आहे. शेतकरी हा न्याय हक्कासाठी आणि घामाच्या दामासाठी संघर्ष करत होता आणि तो यापुढेही लढतच राहील, अशी भावना राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. .''भगवान काटे आणि इतर ८० जणांवर ३०२, ३९५ आणि अनेक कलमांखाली २०११ साली गुन्हा दाखल केला होता. आज जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्री. कश्यप यांनी आम्हा सर्वांची निर्दोष सुटका केली. खरतंर अॅड. शास्त्री, श्रेणीक पाटील, सुवर्ण पाटील, तनिष्क जाधव यांनी यासाठी मेहनत घेतली. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी गुन्हे दाखल केल्याचा दावा करण्यात आला. माझ्यासह माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सावकार मादनाईक अशा आमच्या ८० लोकांवर गुन्हा दाखल झाला होता. आता यातून आमची निर्दोष मुक्तता झाली आहे. याचा आम्हाला आनंद होत आहे. हे दुसरे कोणी नसून सर्व शेतकरी आहेत.'' असे शेट्टी म्हणाले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.