Buldhana News: : जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबा यांच्या शिल्पाचे अनावरण नुकतेच पार पडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव प्रमुख उपस्थित होते..यावेळी बोलताना ना. जाधव यांनी सांगितले की, जिजाऊ आणि बाल शिवबा यांचे शिल्प हे केवळ स्मारक नसून विकसित भारताच्या संकल्पनेला प्रेरणा देणारे आहे. स्वराज्य ते सुराज्य हा प्रवास अधिक बळकट करण्यासाठी महापुरुषांच्या विचारांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले..Shivaji Maharaj Jayanti: शिवाजी महाराजांचे जागतिक वेगळेपण.कार्यक्रमास आ. संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. आ. गायकवाड यांनी जिल्हा परिषदेकडून शिवजयंतीनिमित्त घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले..सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनअनावरण सोहळा संगीत, आतषबाजी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला. युवा शाहीर विक्रांत सिंग राजपूत यांच्या शिवचरित्र कथनाने वातावरण भारावून गेले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांना उपस्थितांची दाद मिळाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.