Public Transport: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या ‘राजमाता जिजाऊ’ या बस सेवेचा लोकार्पण सोहळा मंगळवारी (ता. २४) पार पडला. .विधान भवन प्रांगणात पार पडलेल्या बस सेवा लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आदी उपस्थित होते..Ahilyanagar - Pune Railway: अहिल्यानगर- पुणे रेल्वे सुरू करण्याची मागणी.एसटी महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या स्मरणार्थ ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या नव्या उपक्रमांतर्गत सुमारे तीन हजार बसेस राज्यभरात टप्प्याटप्प्याने दाखल होणार असून, प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे..Traffic Diversion: सैलानी उत्सवामुळे वाहतुकीच्या मार्गात बदल.एसटी महामंडळाच्या ताफ्यात यापूर्वी ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘हिरकणी’ आणि ‘यशवंती’ अशा विविध सेवांचा समावेश असून, ‘राजमाता जिजाऊ’ ही बस सेवा त्या मालिकेत आणखी एक महत्त्वाची भर असणार आहे. या उपक्रमामुळे राज्यातील सार्वजनिक परिवहन अधिक सक्षम आणि प्रवासी-केंद्रित होण्यास मदत होणार आहे, असे एसटी महामंडळाने म्हटले आहे.मुख्यमंत्री फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी बसचे पूजन करून आणि फीत कापून या सेवेची सुरुवात केली..या बस सेवेचे लोकार्पण झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी बसमधून प्रवासही केला. यावेळी बसच्या समोर प्रतिकात्मक स्वरूपात घोड्यावर आरूढ झालेल्या राजमाता जिजाऊ यांचा देखावाही उपस्थितांनी अनुभवला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.