Rajhans Dairy Industry: संगमनेर येथील तालुका दूध सहकारी उत्पादक व प्रक्रिया संघाने (राजहंस) सौर ऊर्जेवर आधारित वीजनिर्मितीचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. अडीच एकर क्षेत्रावर उभारलेल्या या प्रकल्पातून दररोज सुमारे १,३५० किलोवॉट क्षमतेची ५,२२० युनिट वीज निर्मिती होणार आहे..दूध संघाकडून राबविण्यात आलेला हा राज्यातील पहिलाच सौर वीजनिर्मिती प्रकल्प असल्याचे सांगण्यात आले. संगमनेर तालुक्यात दररोज चार लाख लिटरहून अधिक दुधाचे संकलन होते. तालुक्यातील सुमारे ८० टक्के शेतकरी पशुपालन व्यवसायाशी जोडले गेले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राजहंस दूध संघाकडून सातत्याने उपक्रम राबविले जात आहेत..Solar Energy Projects: दुर्गम भागातील भूमिपुत्रांना सौरजलचा आधार.माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या वेळी संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, आमदार सत्यजित तांबे, लक्ष्मणराव कुटे, आर. बी. राहणे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, ॲड. नानासाहेब शिंदे, संचालक विलासराव वर्पे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबनराव कुऱ्हाडे, .बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू ढोले, रवींद्र रोहम, प्रतिभाताई जोंधळे, मंदाताई नवले, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे, सुभाष सांगळे, सल्लागार विनीत शहा, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, हर्षल सातव, सिद्धार्थ थोरात आदी उपस्थित होते..Hydro Electric Power Generation Project : ‘पाटगाव’मधून अदानींच्या प्रकल्पास पाणी देण्यास स्थगिती.यावेळी थोरात म्हणाले, की राजहंस दूध संघाने गुणवत्ता आणि शुद्धतेच्या बळावर राज्यभर वेगळी ओळख निर्माण केली आहे. दूध उत्पादकांनी स्वच्छता व गुणवत्तेला अधिक प्राधान्य देत जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी सज्ज व्हावे. दूध हे लहान मुलांपासून सर्वांच्या आहारातील महत्त्वाचे अन्न असल्याने त्याच्या शुद्धतेबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे..प्रकल्पाचा खर्च तीन वर्षांत वीज निर्मितीतून वसूल होईल. त्यानंतर संघाला कायमस्वरूपी वीज उपलब्ध होणार आहे.- रणजितसिंह देशमुख, अध्यक्ष, राजहंस दूध संघ, संगमनेर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.