Environmental Damage Issue: देवळा व चांदवड तालुक्यांच्या सीमेवरील ऐतिहासिक राजधेर डोंगरावर नुकताच भीषण वणवा लागून मोठ्या प्रमाणावर वनसंपदा जळून खाक झाली. आगीच्या तीव्रतेमुळे वाखारी-भिलवाड परिसरातील वनक्षेत्रालाही मोठा फटका बसला असून, येथील जैवविविधतेसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे..डोंगराच्या माथ्यावर लागलेली आग उन्हाची तीव्रता व वाळलेल्या गवतामुळे अल्पावधीतच भडकली. उंच कड्यांवरून ही आग देवळा तालुक्यातील वाखारी व भिलवाडच्या दिशेने झपाट्याने पसरली. रात्रीच्या वेळी आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले..Pavnarakhari Forest Fire: पवनारखारीच्या जंगलात भीषण आग .घटनेची माहिती मिळताच देवळा वनपरिक्षेत्राचे वनपाल प्रसाद पाटील, वनरक्षक विजय पगार, नामदेव ठाकरे यांच्यासह वनमजूर व स्थानिक तरुणांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र उंच व कठीण डोंगरमाथा, तसेच घाणेरी व गुलतुरा यांसारख्या काटेरी वनस्पतींमुळे आगीपर्यंत पोहोचणे अवघड झाले. .Wheat Crop Fire: परभणी, हिंगोलीत सहा एकरांवरील गहू आगीत जळून खाक.या वेळी आग विझविण्यासाठी आवश्यक आधुनिक यंत्रणेचा अभाव असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. या वणव्यात गवत, औषधी वनस्पती व लहान-मोठी झाडे नष्ट झाली असून, पक्ष्यांची घरटी व वन्यजीवांचा अधिवास उद्ध्वस्त झाला आहे. पर्यावरणाचे न भरून येणारे नुकसान झाल्याची भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे..वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हवणवा लागल्यानंतर वन विभागाची यंत्रणा वेळेवर सक्रिय झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. संंबंधितांशी संपर्क साधूनही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याची तक्रार त्यांनी केली..दरवर्षी वणवे लागतात; मात्र त्यांना आळा घालण्यासाठी वन विभागाकडे ठोस यंत्रणा नाही. अधिकाऱ्यांकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळतात. वनसंपदा व जैवविविधता वाचवण्यासाठी प्रशासनाने गांभीर्यपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.शिवाजीराव पवार, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, देवळा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.