Livestock Management: राजस्थानातून चराईसाठी आलेल्या मेंढपाळांचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. दुष्काळामुळे परराज्यातील पशुधनाला चराईसाठी बंदी घातली आहे. मात्र, शेतकरी संघटना, स्थानिक शेतकरी आणि मेंढपाळ या निर्णयाला विरोध करीत सकारात्मक तोडगा काढण्याची मागणी करीत आहेत. .दरम्यान, अकोटच्या तहसीलदारांनी कायद्यानुसार स्थानिक क्षेत्रात परराज्यातील जनावरांना चराईसाठी परवानगी नसल्याचे स्पष्ट करणारे पत्र काढले. या आदेशाची शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (ता.२२) प्रतीकात्मक होळी केली. तसेच मुख्यमंत्र्यांकडे निवेदनही पाठवले..Rajasthan Shepherds: परराज्यातील मेंढ्यांचा कळप अकोला जिल्ह्यात अडकला.गेल्या आठवड्यात राजस्थानातून आलेल्या मेंढपाळांचा प्रश्न स्थानिक प्रशासनासाठी डोकेदुखी ठरला आहे. कमी पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पशुसंवर्धन विभागाच्या अहवालानुसार जानेवारी २०२७ पर्यंत उपलब्ध चारा पुरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बाहेरील पशुधनाला जिल्ह्यात चराईसाठी बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पथकेही नियुक्त केली आहेत. परराज्यातून आलेल्या पशुधनासह संबंधितांनी अकोट तालुक्यातून बाहेर पडावे, असे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत..Shepherds Issue : चारा टंचाई आणि पीक नुकसानीचा फटका: परराज्यातील मेंढपाळांच्या प्रवेशावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाला निवेदन!.चराईच्या बदल्यात शेतकऱ्यांना मोबदलादरम्यान, सोमवारी (ता.२३) शेतकरी संघटनेने (रघुनाथदादा पाटील प्रणीत) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले. कपाशीचे पीक काढल्यानंतर शेतकरी रब्बीच्या पेरणीपूर्वी पिकांचे अवशेष व पालापाचोळा शेळ्या-मेंढ्यांना खाण्यासाठी देतात. यामुळे शेतातील अवशेष नष्ट होण्यासोबतच जनावरांच्या विष्ठेमुळे जमिनीला सेंद्रिय खत मिळते. जुन्या पिकांवरील रोग व किडींचे अवशेषही मेंढ्यांकडून खाल्ले जातात. .एकाच वेळी मोठ्या क्षेत्रातील कपाशीची काढणी होत असल्याने स्थानिक पशुधन पुरेसे उपलब्ध होत नाही. अशावेळी बाहेरील जिल्ह्यांतून किंवा राज्यांतून येणारे पशुपालक चराईच्या बदल्यात शेतकऱ्यांना आर्थिक मोबदलाही देतात. त्यामुळे रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते, असे निवेदनात म्हटले आहे..शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या शासन आदेशाची शेतकरी संघटनेने होळी करून निषेध जाहीर केला. शेतकऱ्यांवर व मेंढी पालकांवर बाळाचा वापर केल्यास सविनय कायदेभंग आंदोलन करणार. - लक्ष्मीकांत कौठकर, विदर्भ अध्यक्ष, शेतकरी संघटना (रघुनाथदादा पाटील प्रणीत).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.