Drought Conditions: राजस्थानातून चराईसाठी आलेला हजारो मेंढ्यांचा कळप गेल्या ४८ तासांपासून अकोला-बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर अडकून पडला आहे. वारखेड-सौंदळा (ता. तेल्हारा) परिसरातील शेतकरी दरवर्षी या मेंढपाळांना शेतातील पिकांचे अवशेष चराईसाठी देतात. यंदाही शेतकऱ्यांची त्यासाठी तयारी असताना दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने परराज्यातील जनावरांना चराईची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मेंढपाळ आणि प्रशासन यांच्यात पेच निर्माण झाला आहे..राजस्थानमधून १२ हजार मेंढ्या, दोन हजार मेंढ्यांची पिल्ले आणि २५ उंटांचा ताफा मंगळवारी (ता. १७) दुपारी वारखेड शिवारात दाखल झाला होता. बुलडाणा-अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील वारखेड फाट्याजवळ पोलिसांनी हा ताफा तपासणी नाक्यावर रोखला. .Shepherd Migration: मेंढपाळांची दसऱ्यापूर्वीच भटकंती.बुधवारी (ता. १८) दिवसभर अधिकारी, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, स्थानिक शेतकरी आणि मेंढपाळ यांच्यात चर्चा झाली. मात्र, त्यातून तोडगा निघाला नाही. मेंढपाळांनी कळपासह जिल्हा सोडून जावे, असे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले. .Leopard Attacks : बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात.त्यानंतर हा ताफा वारखेड येथून सौंदळा शिवारात पोहोचला. अकोला जिल्ह्यात कुठेही मेंढ्यांना चराईसाठी थांबवू नये, अशी भूमिका स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घेतली आहे..या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांनी शेतकऱ्यांसह जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. शेतकरी आणि मेंढपाळांची भूमिका लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.