Jaypur News: राजस्थानामध्ये जोरदार पाऊस सुरूच असून, सोमवार आणि मंगळवारी (ता. २५ आणि ता. २६) राज्याच्या विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुरक्षिततेची खबरदारी म्हणून जयपूरसह इतर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. .जयपूरच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राजसमंद, सिरोही आणि उदयपूर जिल्ह्यांसाठी सोमवारी पावसाचा ‘ऑरेंज ॲलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर सुमारे डझनभर जिल्ह्यांमध्ये ‘यलो ॲलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस ही तीव्र लाट कायम राहण्याची शक्यता विभागाने व्यक्त केली आहे..सोमवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत नागौर, चुरू, जालोर, उदयपूर आणि सिरोही येथे मुसळधार पाऊस झाला, तर सीकर, हनुमानगड, बिकानेर, जोधपूर, धौलपूर आणि अजमेर येथे मुसळधार पाऊस झाला. या काळात नागौरमध्ये सर्वाधिक १७३ मिमी पावसाची नोंद झाली..Monsoon Heavy Rain: पावसाचे देशभरात १२ बळी .अनेक जिल्ह्यांत पूरस्थितीगेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे राज्यभरातील सामान्य जनजीवन विस्कळित झाले असून, कोटा, बुंदी आणि सवाई माधोपूर जिल्ह्यातील अनेक सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या शहरांचा मोठा भाग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यास सांगण्यात आले आहे..तीन जिल्ह्यांमधील मदत आणि बचाव कार्यात नागरी अधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी लष्कराला बोलावण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (एनडीआरएफ) सात पथके आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) ५७ पथके राज्याच्या विविध भागात तैनात करण्यात आली आहेत. जयपूरसह अनेक जिल्ह्यांतील स्थानिक प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव पुढील दोन दिवस इयत्ता बारावीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे..Pune Heavy Rain: पश्चिम भागात घाटमाथ्यावर पाऊस सुरूच.हिमाचल प्रदेशला तडाखाशिमला, ता. २५ (पीटीआय) : हिमाचल प्रदेशच्या विविध भागांत जोरदार पाऊस सुरू असून, आठ जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. मुसळधार पावसाने तीन राष्ट्रीय महामार्गांसह ६८५ रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने सोमवारी कांगडा आणि चंबा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून, ‘रेड अॅलर्ट’ जारी केला आहे. प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाने ३१ ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे..पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर मणिमहेश यात्रा स्थगित करण्यात आली आहे, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी कुलदीप सिंग राणा यांनी सांगितले. ही यात्रा १७ ऑगस्ट रोजी सुरू झाली होती. कांगडा जिल्ह्यात, मुसळधार पावसामुळे हमीरपूरमधील तालुका कार्यालयात पाणी शिरले असून, अनेक भागांतील वाहने पावसाच्या पाण्यात तरंगत होती. .शिमला जिल्ह्यातील तुतीकंडी भागात घराची संरक्षक भिंत कोसळली. मुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर बिलासपूर, हमीरपूर, मंडी, कांगडा, कुल्लू, चंबा, उना आणि सोलन जिल्ह्यातील निवासी शाळा वगळता सर्व सरकारी आणि खासगी शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे विविध गावांतील अनेक रस्ते बंद झाले आहेत..पंजाबलाही झोडपलेचंडीगड : मुसळधार पावसामुळे पठाणकोट जिल्हा प्रशासनाने सोमवारी सर्व शिक्षणसंस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे रावीसह इतर नद्या आणि ओढ्यांमधील पाण्याची पातळी वाढल्याने पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यातील गावांना मोठा फटका बसला आहे. पठाणकोट जिल्ह्यातील मुसळधार पाऊस लक्षात घेऊन पठाणकोट जिल्ह्यातील सर्व सरकारी/बिगर सरकारी शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. पंजाबचे कॅबिनेट मंत्री लालचंद कटारुचक यांनी रविवारी (ता. २४) पूरग्रस्त भागांना भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेतला होता. पुरामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मदतीचे आश्वासन त्यांनी दिले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.