Spurious Fertilizer: राजस्थानमध्ये बोगस खते आणि बियाण्यांविरुद्ध मोठी कारवाई सुरू आहे. राजस्थानचे कृषिमंत्री डॉ. किरोडी लाल मीणा यांच्या उपस्थितीत २८ सप्टेंबरच्या रात्री उशिरा बिकानेरच्या कोलायत येथील दोन खत कारखान्यांवर छापेमारी करण्यात आली. या कारवाईत बोगस खताच्या ६४ हजार पिशव्या जप्त करण्यात आल्या. या बोगस खताचा पुरवठा देशातील इतर राज्ये आणि नेपाळला केला जात होता. हे खत कारखाने सील करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत..गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील बोगस खते आणि बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध धडक कारवाई करणारे कृषिमंत्री मीना अधिकाऱ्यांसह खारी गंगापुरा गावात पोहोचले. बोगस खतांच्या पुरवठ्याबाबत आलेल्या तक्रारींच्या आधारे त्यांनी रविवारी रात्री उशिरा दोन खत कारखान्यांची अचानक तपासणी केली..Fertilizer Shortage: रब्बीतही खतांची टंचाई जाणवणार ? खत पुरवठ्याबाबत कृषीमंत्र्यांचे मौन.मीना यांनी सांगितले, "आमच्याकडे या कारखान्यांबाबत तक्रारी आल्या होत्या. या आधारे मातीमिश्रित खताच्या ६४ हजार पिशव्या जप्त करण्यात आल्या. हा खत पुरवठा राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांत, इतर राज्यांत आणि नेपाळमध्ये केला जाणार होता.".मंत्री मीणा यांनी यापूर्वी गंगानगर आणि अलवर येथील खत आणि बियाणे कंपन्यांवर कारवाई केली होती. बोगस बियाणे आणि खते उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्याची योजना त्यांनी आखली आहे. .Fake Fertilizer : खतामध्ये आढळले चक्क प्लॅस्टिकचे दाणे ."गेल्या काही महिन्यांत बियाणे आणि खत कंपन्यांविरुद्ध दाखल झालेले सर्व एफआयआर एकत्रित करून ते स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) अथवा विशेष तपास पथक (एसआयटी) यांच्याकडे सोपविले जातील. याबाबत माझी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांशी चर्चा झाली आहे. आता मी यावर स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन," असे मीणा म्हणाले..किरोडी लाल मीणा पुढे म्हणाले की, या कारवाईदरम्यान गोदामात आढळून आलेले बोगस डीएपी खत चार महिन्यांपूर्वी किशनगडमध्ये सापडलेल्या खतासारखेच दिसून आले. .कंपन्यांचे परवाने रद्द होणारया खतांमध्ये रसायने मिसळून त्याची विक्री केली जात होती. परिणामी शेतकऱ्यांची जमीन नापीक होत चालली आहे, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले. त्यांनी छापेमारीदरम्यान अधिकाऱ्यांना बोलावले आणि या प्रकरणी पुढील चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी तपासानंतर आरोपांची पुष्टी झाल्यास संबंधित कंपन्यांचे परवाने रद्द केले जातील, असा इशारा त्यांनी दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.