श्रीमती नीलिमा व्ही. पाटील, डॉ. किशोर झाडेपावसाळी हंगामामध्ये गाव परिसरामध्ये सहज व नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात. मृग नक्षत्रानंतर संपूर्ण एक दोन महिन्यामध्ये शेतावरील बांधावर, मोकळ्या रानावर, पडीत जमिनीमध्ये तसेच आदिवासी भागातील डोंगराळ टेकडीवर विविध बहुपयोगी वनस्पती उगवतात. .त्या चवीला रुचकर असून, आरोग्याच्या दृष्टीनेही उपयुक्त आहेत. या प्रचलित नसलेल्या भाज्या लोह किंवा कॅल्शिअमयुक्त असून, विविध जीवनसत्त्वे, खनिजांनी परिपूर्ण आहेत. रानभाज्यांमध्ये असलेल्या पोषक तत्त्वे आणि जीवनसत्त्वांसोबतच त्यात असणारे तंतुमय पदार्थ, चोथा (फायबर) पचनप्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. .Wild Vegetables: पुरंदर किल्ल्याच्या परिसरात बहरल्या रानभाज्या.आतडी कार्यक्षम राहून अनावश्यक विषमय पदार्थ बाहेर ढकलले जातात. मात्र बहुतांश उपयुक्त वनस्पतींची आपल्याला माहिती नसते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून असलेल्या त्यांचे फायदे व महत्त्व जाणून घेऊन त्यांचा आहारात समावेश करावा..करटोलीशा. नाव : Momordica dioicaकुळ : Cucurbitaceaeस्थानिक नावे : कर्दुले / करटोली / काटवल / कंटोळी / रानकारलीइंग्रजी नाव : Spine gourdखाण्यायोग्य भाग : कोवळी फळेउपलब्धता : जून ते सप्टेंबरअभिवृद्धी : कंद, बियापोषणतत्त्वेयात अ आणि क जीवनसत्त्व, प्रथिने, कॅल्शिअम, तंतुमय पदार्थ भरपूर असून, कमी प्रमाणात जीवनसत्त्व ब मिळते. डोळ्यांच्या आरोग्याकरिता फायदेशीर आहे. हाडे व दातांना मजबुती देते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. रक्तातील आवश्यक घटक निर्माण करते. पचनक्रिया सुरळीत ठेवते.औषधी गुणधर्मरक्तातील साखर कमी करते. मधुमेहींसाठी उपयुक्त.ही भाजी तापातून उठलेल्या रोग्यास पोषक म्हणून देतात.रोग प्रतिकारकता वाढवत असल्याने सर्दी, खोकला, ताप या पावसाळ्यातील विकारांवर हितावह आहे.त्वचारोग होऊ नयेत म्हणून ही भाजी अवश्य खावी..Wild Vegetables Fair : सातपुड्याच्या पायथ्याशी रंगतोय सालईबन रानभाजी महोत्सव.लालमाठशास्त्रीय नाव : Amaranthus Cruentus L.कुळ : Amaranthaceaeस्थानिक नावे : लाल माठ, लाल भाजी, श्रावणी माठइंग्रजी नाव : Red Amaranth, Blood Amaranthखाण्यायोग्य भाग : कोवळी पाने, कोवळी देठउपलब्धता : जुलै - सप्टेंबर (वर्षभर उपलब्ध.)अभिवृद्धी : बियाऔषधी गुणधर्मपाचक असून, आम्लपित्त विकारांत विशेष उपयोगी आहे. किडनीचे आरोग्य सुधारते.अँटिबॅक्टेरिअल म्हणून काम करते.श्वसनाच्या विकारावर अतिशय गुणकारी आहे. सर्दी आणि संसर्गापासून बचाव होतो.शरीरातील कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यास मदत करत असल्याने मधुमेहींसाठी उपयुक्त आहे.स्तनदा मातेकरीता दूध वाढण्यास उपयुक्त आहे.भाजीतील फोलेटमुळे गर्भवती मातेने नियमित सेवन केल्यास गर्भाचे नीट पोषण होते.मूतखड्याची तक्रार असणाऱ्यांनी माठाचा वापर टाळवा.पारंपरिक पदार्थ : सुकी भाजी, पानाची किंवा देठाची डाळ घालून भाजी, शिरा, बियांपासून लाडू.श्रीमती नीलिमा व्ही. पाटील, ८२०८७८८७७६कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोलीया भाजीत जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व व, जीवनसत्त्व क, कॅल्शिअम, मॅग्रेशिअम, फॉस्फरस, झिंक आणि तंतुमय पदार्थाचा भरपूर साठा असतो.लोह भरपूर असल्यामुळे अॅनिमिया कमी होतो.हाडे व दातांना मजबुती देते.गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरी व कुपोषित बालके याकरिता लाल माठ अतिशय पोषक आहे.जीवनसत्त्व अ आणि बीटा केरोटिन असल्यामुळे डोळे, तोंड, नाक आणि पोटाच्या आरोग्याकरिता उत्तम.तंतुमय पदार्थ पचन करण्यास मदत करते. .औषधी गुणधर्मपाचक असून, आम्लपित्त विकारांत विशेष उपयोगी आहे. किडनीचे आरोग्य सुधारते.अँटिबॅक्टेरिअल म्हणून काम करते.श्वसनाच्या विकारावर अतिशय गुणकारी आहे. सर्दी आणि संसर्गापासून बचाव होतो.शरीरातील कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यास मदत करत असल्याने मधुमेहींसाठी उपयुक्त आहे.स्तनदा मातेकरीता दूध वाढण्यास उपयुक्त आहे.भाजीतील फोलेटमुळे गर्भवती मातेने नियमित सेवन केल्यास गर्भाचे नीट पोषण होते.मूतखड्याची तक्रार असणाऱ्यांनी माठाचा वापर टाळवा.पारंपरिक पदार्थ : सुकी भाजी, पानाची किंवा देठाची डाळ घालून भाजी, शिरा, बियांपासून लाडू.श्रीमती नीलिमा व्ही. पाटील, ८२०८७८८७७६कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.