Paddy Farming: पावसातील खंडामुळे विलंबाने झालेली भातरोप पुनर्लागवड आणि लागवडीनंतर पावसातील अनियमितपणा यामुळे भातपिकांची अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यातच ऊन-पावसामुळे करप्यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाअभावी पिकांमध्ये प्रचंड प्रमाणात तणही वाढले आहे. त्यामुळे यावर्षी उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे..एलनिनोचा सर्वाधिक फटका कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसला आहे. कोकणातील दक्षिणेकडील जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस झाला..India Pulses Market: कडधान्यांचे भाव दबावात का?.मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॉन्सून दाखल झाल्यापासूनच पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात काही प्रमाणात भात रोपवाटिका तयार करण्यात आल्या. परंतु त्यानंतर पावसाने उघडीप दिली. तब्बल १५ दिवस पाऊस गायब होता. त्यामुळे दोन रोपवाटिकांमध्ये अधिक अंतर राहिले. दरम्यान, जून आणि जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने भातरोप पुनर्लागवडीत मोठा खंड पडला. काही भागांत ३५ ते ४० दिवसांनंतर रोप लागवड झाली..Pomegranate Farming Success Story: पाटेठाण पंचक्रोशीत डाळिंबाची क्रांती.भातरोप पुनर्लागवड पूर्ण झाल्यानंतरदेखील पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. भातखाचरात पाणीसाठाच न झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात तण आले आहे. अनेक भागांत भातपिकाची वाढच खुंटल्याचे दिसून येत आहे. सद्यःस्थितीत सरासरीच्या ३३ टक्के इतकी तूट आहे. त्यातच हवामान विभागाने सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये एलनिनोचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज दिला आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत सरासरीपेक्षा खूपच कमी पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात जून ते २८ ऑगस्टपर्यंत १७०४.३ मिलिमीटर पाऊस झाला असून, १९९१ ते २०२५ च्या सरासरीनुसार २५४७.५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित होता. त्यामुळे यावर्षी सरासरीच्या ८४३.२ मिलिमीटर पावसाची तूट दिसून येत आहे..जिल्ह्यात अजूनपर्यंत भातपिकांची स्थिती समाधानकारक आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी उशिरा लावणी केली आहे, त्या पिकांमध्ये कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्या क्षेत्राला खते वेळेत द्यावीत. भातखाचरात पाणी कायम ठेवावे.- डॉ. विजय दळवी, सहयोगी अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे.पावसाअभावी यावर्षी भातरोप पुनर्लागवड विलंबाने झाली. त्यानंतरदेखील अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे भातपिकाची वाढ खुंटली आहे. ऑगस्टमध्ये पूर्ण वाढ झाली तरच पिकाला लोंबी चांगली येते आणि उत्पादन चांगले मिळते. मात्र, यावर्षी उत्पादन घटण्याचीच चिन्हे आहेत.- रणजित तावडे, भात उत्पादक, वाभवे-वैभववाडी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.