Pune News: राज्यात चार ते पाच दिवसांच्या उघडिपीनंतर पुन्हा पावसाने जोर धरला आहे. शनिवारी (ता.२७) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यातील तब्बल २६५ मंडलांत अतिवृष्टी झाली असून लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद आणि हडोळती मंडलांत सर्वाधिक १६३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. पीक नुकसानीचा आकडा वाढत चालल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत येत आहे..मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी हाहाकार उडाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांच्या पात्राबाहेर पाणी गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. गेल्या आठवड्यात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने चांगलीच दाणादाण उडवली होती. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला होता. शुक्रवारपासून पुन्हा राज्यातील १९ जिल्ह्यांत पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे अनेक गावांना पाण्याचा वेढा पडल्याने एनडीआरफच्या तुकड्याच्या माध्यमातून नागरिकांना स्थलांतर करण्यात येत आहे. काही ठिकाणी पाण्यात शेती गेल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक धरणे भरल्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येत आहे. कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या असून खानदेशातही बहुतांश ठिकाणी शिडकावा झाला..Rain Crop Loss : ‘साहेब, चांगलं पीक आलं, पण पावसानं सगळं नेलं.मध्य महाराष्ट्रात जोरमध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पावसाने चांगला जोर धरला आहे. सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती काहीशी निवळत असताना शनिवारी पुन्हा मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच सीना नदीत जवळपास १ लाख क्युसेकइतके पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने पुन्हा एकदा पूरस्थितीची शक्यता निर्माण झाली आहे. सांगली जिल्ह्यातील २२ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे शेतात पाणी साचले असून खरीप पिकाची काढणी रखडली आहे. द्राक्ष फळ छाटणी सुरू होण्याअगोदरच छाटणीला ब्रेक लागला आहे. जिल्ह्यातील पिकांची नुकसानीचे आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे..मराठवाड्यात पुन्हा दाणादाणमराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत पावसाने चांगला उद्रेक केला आहे. बीडमध्ये वरुणराजाचा पुन्हा एकदा जिल्ह्यावर कोप झाला आहे. ऑगस्टमध्ये अतिवृष्टीनंतर या पंधरवड्यात आठव्यांदा जिल्ह्यातील २० मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. अंबाजोगाई तालुक्यात विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. केज, माजलगाव, परळी तालुक्यांत तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला असून काही गावांत वाहतूक बंद करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील २५ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. मागील चोवीस तासांत सरासरी ५१ मिलिमीटर पाऊस झाला. यामुळे पूर येऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शनिवारी सकाळी नऊ ते बारापर्यंत काहीसा जोर कमी झालेला पाऊस पुन्हा वाढला आहे..Rain Crop Damage : अतिवृष्टी पीकनुकसानीचे ८६ टक्के पंचनामे पूर्ण.परभणी, हिंगोलीला पुन्हा तडाखापरभणी व हिंगोली जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडला आहे. दोन जिल्ह्यांतील ८२ पैकी ४१ मंडलांत अतिवृष्टी झाली. त्यात १४ मंडलांत १०० मिमीपेक्षा जास्त, तर २६ मंडलांत ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पालम, पूर्णा येथे गंभीर पूरस्थिती उद्भवली आहे. लातूर, धाराशिव दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. चार दिवस कहर केल्यानंतर दोन दिवस उघडीप घेतली. यातून शेतकरी व नागरिक सावरत असतानाच पावसाने दोन्ही जिल्ह्यांना पुन्हा झोडपून काढले. लातूर जिल्ह्यात विक्रमी ७५.३ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील ६० पैकी ३८ मंडलांत अतिवृष्टी झाली असून धाराशिव जिल्ह्यातही ५५ मिलिमीटर पाऊस होऊन ४२ पैकी १६ मंडलांत अतिवृष्टी झाली आहे..विदर्भातही जोर वाढलाविदर्भाच्या अनेक भागात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत अनेकठिकाणी अतिवृष्टी झाली. सततच्या पावसामुळे शेतकरी हतबल झाले असून, उभ्या तसेच परिपक्व झालेल्या सोयाबीन पिकाचे सोयाबीनचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. शेंगा ओलसर राहिल्याने काढणी व मळणी प्रक्रियेत अडचणी निर्माण होत आहेत. अकोला, बुलडाणा आणि वाशीम या तिन्ही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामाचा सर्वांत महत्त्वाचा सोयाबीन हंगाम धोक्यात आला आहे. पश्चिम विदर्भात पावसाचा जोर कायम राहिल्यास खरीप हंगामातील नुकसान आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे..शनिवारी (ता.२) सकाळी आठ वाजेपर्यंत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झालेली मंडले :खर्डा, नायगाव, सकट १२०, शिवणे, महूड ११०, तेरला ११४, अहमदपूर, खांडली, अंधोरी १३२, हाडोलती १६३, उदगीर १०९, वाढवना १०१, मोघा, तोंडर १०९, चाकूर, वाडवल, शेलगाव, गंगाखेड १०६, आनळा ११४, विष्णूपुरी १३२, आदमपूर १०१, जांब, कुरूळा, दिग्रस बु, पिंपळदरी, पेठशिवनी १११, कंधार, मालकोळी १२८, बाऱ्हळी १०२, ओस्माननगर, लोहा, सोनखेड १४८, रानी, चाटोरी १४३, पालम १५३, बनवास १३९, रावराजूर ११३, कळमनुरी १०३, वाकोडी १०७, वसमत १२८, आंबा ११२, हयातनगर १२८, कुरूंदा १०४, आमगाव, शंकरपूर, अंबोली ११३, एटापल्ली १०५, कोर्ची १२७.(स्त्रोत : कृषी विभाग).राज्यातील २६५ मंडलांत अतिवृष्टी, अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक १६५ मिमी पाऊस-- हिंगोलीत चोंढी बहिरोबा (ता. वसमत,) बिबथर व कोंढूर डिग्रस (ता.कळमनुरी) गावांचा संपर्क तुटला.- परभणीतील पालम तालुक्यातील गलाटी नदीला पूर- किल्लेधारूर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला- परभणीतील केरवाडी (ता. पालम) येथे हजारो हेक्टर वरील पिके पाण्याखाली- आटपाडीतील फरशी, पिंपरी येथील माणगंगा नदीवरील पुलासह ग्रामीण भागाला जोडणारे १५ गावचे पूल पहिल्यांदाच पाण्याखाली- कोयनेतून २०,७६४ क्युसेक विसर्ग सुरू- कंधारमधील (नांदेड) सावळेश्वर येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू- सांगलीत आठ जिल्ह्यांतील महामार्ग बंद- अग्रणी नदीच्या पाणी पातळीत वाढ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.