Sangli News : जिल्ह्यातील विविध भागांत रविवारी (ता. १४) पावसाने हजेरी लावली. गेल्या चोवीस तासांत १२ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, वारणा धरणात पाण्याची आवक वाढल्याने ४९८० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे..जिल्ह्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. परिणामी काही अंशी पिकांना पावसाने दडी मारण्याने फटका बसला आहे. दोन दिवसांपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासांत बारा मिमी पावसाची नोंद झाली..Warna Dam : सांगलीत वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू.कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. वारणाच्या पाणलोट क्षेत्रामधून धरणात पाण्याची आवक वाढली आहे. .Warna Dam : वारणा धरणपाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला.त्यामुळे पाणी नियंत्रित ठेवण्यासाठी सोमवारी (ता. १५) धरणातून वक्र द्वाराद्वारे ३३८० तर विद्युत गृहातून १६३० क्युसेक असा एकूण ४९८० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास अथवा धरणात पाण्याची आवक वाढू लागल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी किंवा वाढवण्यात येईल, असे धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे..तालुकानिहाय गेल्या २४ तासांत झालेला पाऊस (मिमी)मिरज ६.३जत ५.८खानापूर २५.९वाळवा ४.८तासगाव २७.४शिराळा ८.४आटपाडी २३.५कवठेमहांकाळ ३३.८पलूस ३.५कडेगाव १३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.