Long Rain Break: पावसाच्या दीर्घ खंडानंतर नांदेड जिल्ह्यात रविवारी (ता. १३) पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सकाळपर्यंतच्या २४ तासांत सरासरी १५.१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हिमायतनगर तालुक्यातील सरसम महसूल मंडलात ९७.५० मिलिमीटर, तर उमरी तालुक्यातील उमरी मंडलात ६५.२५ मिलिमीटर पाऊस झाल्याने या दोन मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. .मात्र, हा पाऊस सर्वदूर नसल्याने पावसाच्या खंडामुळे अडचणीत आलेल्या खरीप पिकांना अद्यापही जोरदार आणि सलग पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात रविवारी सर्वाधिक पाऊस हिमायतनगर तालुक्यात ४६.८० मिलिमीटर झाला. भोकर व उमरी तालुक्यांत प्रत्येकी ३४ मिलिमीटर, धर्माबादमध्ये २२.८०, नायगावमध्ये २२.२०, किनवटमध्ये २०.६०, मुदखेडमध्ये २०.२०, हदगावमध्ये १५, नांदेडमध्ये ११.५०, लोह्यात १०.६०, माहूरमध्ये ९.३०, बिलोलीमध्ये ९.७०, कंधारमध्ये ८.१०, अर्धापूरमध्ये ६.५०, तर देगलूरमध्ये अवघा १.४० मिलिमीटर पाऊस झाला..Ahilyanagar Rain Deficit : अहिल्यानगरमध्ये पाच लाख हेक्टरवरील पिके संकटात.खरीप पिकांना अजूनही दिलासा अपुराऑगस्ट महिन्यातील दीर्घ पावसाच्या खंडानंतर सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातही पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे कोरडवाहू भागातील कापूस, सोयाबीन, तूर यांसह अन्य खरीप पिकांवर पाण्याच्या ताणाचे संकट निर्माण झाले आहे. रविवारी काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस झाल्याने पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी जिल्हाभर पुरेसा आणि सलग पाऊस झालेला नसल्याने पिकांची स्थिती सुधारण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे. विशेषतः देगलूर, बिलोली, कंधार, लोहा, अर्धापूर आदी भागांत झालेला पाऊस तुलनेने कमी आहे. त्यामुळे पावसाचे वितरण असमान राहिल्याचे चित्र आहे..Vidarbha Rain Update: विदर्भात पावसाचा जोर वाढला.आतापर्यंत ५४५.१० मिलिमीटर पाऊसजिल्ह्यात १ जूनपासून १३ सप्टेंबरपर्यंत ५४५.१० मिलिमीटर पाऊस झाला आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीतील जिल्ह्याची सरासरी ८९१.३० मिलिमीटर असून, आतापर्यंत झालेला पाऊस सरासरीच्या ६१.१६ टक्के आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत जिल्ह्यात ८८९.१० मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेतही पर्जन्यमानात मोठी तूट आहे..दोन मंडलांत अतिवृष्टीरविवारी सकाळपर्यंतच्या नोंदीनुसार ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या मंडलांमध्ये सरसम व उमरीचा समावेश आहे. सरसम मंडलात ९७.५० मिलिमीटर, तर उमरी मंडलात ६५.२५ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे काही भागांत मुसळधार पाऊस, तर लगतच्या भागांत अत्यल्प पाऊस, अशी विसंगत स्थिती कायम आहे..तालुकानिहाय झालेला पाऊस (मिलिमीटर)नांदेड ११.५०, बिलोली ९.७०, मुखेड ३.२०, कंधार ८.१०, लोहा १०.६०, हदगाव १५.००, भोकर ३४.००, देगलूर १.४०, किनवट २०.६०, मुदखेड २०.२०, हिमायतनगर ४६.८०, माहूर ९.३०, धर्माबाद २२.८०, उमरी ३४.००, अर्धापूर ६.५०, नायगाव २२.२०..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.