Pune News: राज्यात सप्टेंबरअखेरीस झालेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला असताना रब्बीच्या तोंडावर पावसाने पुन्हा दणका दिला आहे. खानदेश, मराठवाड्यातील पाच आणि नगर अशा एकूण सहा जिल्ह्यांना सर्वाधिक पावसाचा फटका बसला. बुधवारी (ता. २८) सकाळी आठपर्यंत मराठवाड्यातील लातूरमधील बोरोळ (ता. देवणी) मंडलात सर्वाधिक १६८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. .गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यातील विविध भागांत जोरदार पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांत पावसामुळे खरिपाच्या नुकसानीत आणखी वाढ होत आहे. सध्या दिवसभर ऊन तर रात्री थंडी अशी स्थिती सुरू आहे. त्यातच काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून अचानक ढग भरून येऊन जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कांदा, तूर, कापूस, भाजीपाला, फळपिकांच्या नुकसानीत वाढ होऊ लागली आहे..Rain Crop Damage: पावसाने पिकांची मोठी हानी.पुण्यात बुधवारी (ता. २९) दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. नगर जिल्ह्यातील नेवासा, शेवगाव तालुक्यांतील अनेक भागांत बुधवारी पहाटेपासून पाऊस पडत आहे. तर शेवगाव तालुक्यातील बोधेगाव, चापडगाव मंडलांत ६७ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे काढणीला आलेल्या कापसाच्या नुकसानीत आणखी वाढ होत आहे. या भागात पंचनामे झाले असले तरी सततच्या पावसामुळे रब्बी हंगामासाठी अजूनही वाफसा आलेला नाही..खानदेशात मागील तीन ते चार दिवस अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस झाला. नंदुरबारमध्ये अनेक भागांत जोरदार पाऊस या आठवड्यात झाला. काही भागांत मध्यम पाऊस होता. यामुळे गिरणा, अंजनी, बोरी, पांझरा, तापी आदी नद्यांना प्रवाही पाणी आले आहे. खानदेशात काही दिवसांपासून पाऊस येत होता. परंतु सर्वदूर हा पाऊस नव्हता. हा पाऊस जेथे आला, तेथे सुसाट वारेही होते. यामुळे केळी, भाजीपाला व अन्य पिकांची हानी झाली..Unseasonal Rain : अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीला.मराठवाड्यातील लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी या पाच जिल्ह्यांत पावसाने पुन्हा धुमाकूळ घातला. जवळपास ५० मंडलांत अतिवृष्टी झाली असून सर्वाधिक अतिवृष्टी लातूर जिल्ह्यात झाली. त्यामुळे शेतात पाणी वाहू लागले असून काढणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. जोरदार पावसामुळे ओढे, नाले पुन्हा ओसंडून वाहू लागले आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील होळणा, रेणा नदीला पूर आला आहे..येथे झाला १०० मिमीहून अधिक पाऊस : स्रोत-कृषी विभागमंडल पडलेला पाऊसबोरोळ १६३रेणापूर १५७पोहरगाव १५७पानगाव १२८बर्दापूर ११८पळशी ११८देवणी १०८.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.