Jalgaon News : खानदेशात मूग पिकात शेंगा तोडणी व काढणीचे काम सुरू आहे. त्यात पावसाचा व्यत्यय येत असून, शेतकरी हाती आलेला घास हिरावून जाऊ नये यासाठी आटापिटा करीत आहेत. मूग पेरणी खानदेशात कमी झाली आहे. मागील हंगामात सुमारे १४ हजार हेक्टरवर मूग पीक होते. पण अतिपावसात मागील वेळेस मुगाची हानी झाली..यंदा मूग पेरणी घटली. सुमारे १२ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यातही केळी पिकासाठी चांगले बेवड मिळावे यासाठी अधिकची पेरणी मुगाची तापी, अनेर, गिरणा आदी नद्यांच्या भागात झाली आहे. अनेकांनी जमीन सुपीकतेसाठी काळ्या कसदार जमिनीत मूग पेरणी केली होती. पेरणी वेळत झाली. कारण वेळेत पाऊस आला. .पेरणीनंतर चांगला पाऊस जूनमध्ये झाला. नंतर जुलैतही पाऊस झाला. पीकवाढ चांगली होती. दोन वेळेस आंतरमशागत, खते व फवारणीचे कामही शेतकऱ्यांनी मूग पिकात घेतले. पण ऐन फुलोरा, फळांच्या अवस्थेत म्हणजेच जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस गायब झाला. ऊन पडायला लागून उष्णता वाढली. यामुळे मूग पिकास फटका बसला. पण काही भागांत तुरळक, हलक्या पावसाने मूग पीक बचावले..पावसाचा मुगास फटकात्याची काढणी या महिन्याच्या मध्यानंतर अनेक भागात सुरू झाली. याच वेळी खानदेशात पावसाचे पुनरागमनही झाले. काही भागात जोरदार व काही भागात मध्यम पाऊस सुरू झाला. पाऊस सुरूच आहे..Moong Crop Disease: मुगावरील लिफ क्रिंकल रोगाचे व्यवस्थापन.यामुळे मूग पिकास फटका बसत आहे. पण शेंगा पक्व झाल्याने त्याची काढणीदेखील आवश्यक आहे. शेतकरी मजूरटंचाईने जेरीस आले आहेत. अशात कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने मूग पिकात काढणी करून घेतली जात आहे. पाऊस दुपारी अनेक भागात बरसतो. अधूनमधून सरी येतात. यामुळे शेंगा ओल्या होतात. त्यामुळे शेतकरी सकाळीच मूग शेंगा तोडणीसाठी शेतात पोचत आहेत..Moong Crop Loss: पावसाने खानदेशात मूग पिकाची हानी.गोठ्यात वाळवणूकशेंगा ओल्या असल्याने त्या तोडल्यानंतर वाळवून घ्याव्या लागत आहेत. त्या वाळविण्यासाठी नीरभ्र वातावरण नाही. यामुळे शेतकरी शेंगा तोडल्यानंतर त्या आपल्या गोठ्यात ठेवत आहेत. त्यावर कृत्रिम हवेसाठी टेबल फॅनचा उपयोग करीत आहेत. वाळवणुकीनंतर गोठ्यातच त्यांची काढणी मनुष्यबळाच्या मदतीने करून घेतली जात आहे..मूग पिकात काढणी सुरू होतानाच पाऊसही आला. पाऊस सुरूच आहे. यामुळे मूग काढणीला फटका बसत आहे. पावसाचा खंड पडला होता. यामुळे उत्पादनही कमी येईल, अशी स्थिती आहे.- राजेंद्र जाधव, शेतकरी, फुपनगरी (ता. जि. जळगाव).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.