Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याकडे पावसाची वक्रदृष्टीची असल्याची स्थिती आहे. जून पासून आत्तापर्यंत या तालुक्यात सरासरी पावसाच्या तुलनेत केवळ ६१.२ नक्कीच पाऊस झाला आहे. .दुसरीकडे लातूर व धाराशिव तालुक्यातही पावसाने अजून अपेक्षित टक्का गाठला नसल्याची स्थिती आहे. याशिवाय मराठवाड्यातील तब्बल १८ तालुक्यात अपेक्षित पाऊस झाला असल्याची नोंद आहे..पावसाच्या लहरीपणाचा पुन्हा एकदा परिचय यंदाही आला आहे. कुठे अति कुठे कमी तर कुठे काहीच नाही असंच काहीसे पावसाचे बरसणे आजवर राहिल आहे. मराठवाड्यातील १८ तालुक्यांमध्ये आजपर्यंत पावसाने अपेक्षित टक्का गाठला नाही..Khandesh Rainfall : अनेक तालुक्यांत १०० टक्क्यांवर पाऊस .त्यामध्ये बीड व छत्रपतीसंभाजी नगरमधील प्रत्येकी दोन, जालना, धाराशिव, नांदेड व हिंगोलीतील प्रत्येकी एक, परभणी व लातूर मधील प्रत्येकी पाच तालुक्याचा यामध्ये समावेश आहे. पावसाळा हा उत्तरार्धाच्या दिशेने वाटचाल करीत असताना मराठवाड्यातील ७६ पैकी तब्बल ४४ तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अपेक्षित पाऊस झाला नसल्याची स्थिती आहे..त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील सात,जालन्यातील पाच, बीड मधील ११, लातूरमधील नऊ, धाराशिवमधील सहा, नांदेडमधील चार, परभणीतील नऊ तर हिंगोलीतील तीन तालुक्यांचा समावेश आहे. उर्वरित तालुक्यात अपेक्षित पावसाच्या पुढे जाऊन पाऊस झाला. .Rainfall News : अनेक तालुक्यांत १०० टक्क्यांवर पाऊस.अनेक तालुक्यात पावसाने अल्प वेळात अति जास्त कोसळून सरासरी च्या पुढे जाण्यास मदत करताना पिकाची आणि शेतीची मोठी नासाडी केली. त्यामुळे पावसाचे हे लहरी वागणे पुन्हा एकदा शेतीच्या मुळावर उठल्याची स्थिती आहे. .परभणी,हिंगोलीतील १४ मंडळांत अतिवृष्टीमराठवाड्यातील परभणी व हिंगोली जिल्ह्यातील १४ मंडळात शनिवारी (ता. १३ )सकाळपर्यंतच्या २४ तासात अतिवृष्टी झाली. त्यामध्ये परभणीतील नऊ तर हिंगोलीतील पाच मंडळांचा समावेश आहे. .अतिवृष्टी झालेल्या मंडळांमध्ये परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील शिंगणापूर मंडलात ६५.५० मिलिमीटर, पिंगळी ९५ परभणी ९५ पूर्णा तालुक्यातील पूर्णा मंडलांत १३९ ताडकळस ९६.२५ कानतेश्वर १४७.५०, पालम तालुक्यातील पालम मंडळात ७९.७५ बनवास ७५.७५ पेठशिवर मंडळात ८९.२५ मिलिमीटर पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील नंदापूर मंडळात ६७.७५ मिलिमीटर पाऊस झाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.