Water Scarcity in Farms: गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने बर्दापूरसह परिसरातील शिवारातील चिंता वाढली आहे. विहीर, बोरवेलची पाणीपातळी घटल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला झालेल्या पावसामुळे सोयाबीनची उगवण चांगली झाली. मात्र त्यानंतर पावसाने सुमारे १५ दिवसांपासून पूर्णपणे दडी मारली. .दिवसभर कडक उन व वारा वाहत असल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. सोयाबीनच्या पिकांची वाढ खुंटली असून काही ठिकाणी सोयाबीन पिके कोमेजून गेली आहेत. वेळेत पाऊस न झाल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन उत्पनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे..Monsoon Rain: काही भागात हलक्या पावसाची शक्यता; राज्यातील बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज.सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, कापूस तसेच इतर खरीप पिकांना तसेच भाजीपाला पिकांना पाण्याअभावी मोठा फटका बसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विहीर व बोअरवेलला पाणी आले नसल्याने सिंचनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत चालला असून काही विहिरी, बोअरवेल आणि इतर जलस्रोत आटण्याच्या मार्गावर आहेत. लवकरच दमदार पाऊस होऊन खरीप हंगाम वाचावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत असताना दिसत आहेत..Dry Spell After Sowing: पेरणीनंतर पावसाचा खंड पडल्यास काय कराल?.दहा ते पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्याने सोयाबीन पिके पाण्याअभावी करपत आहे. विहिरीला व बोअरवेललाही पाणी आले नाही त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी पाणीच नाही.बालासाहेब बिडवे,सोयाबीन उत्पादक शेतकरी बर्दापूर.पेरणी केली आणि पाऊस बंद झाला. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने उगवून आलेले सोयाबीन पीक वाळत आहे. पावसाअभावी भाजीपाला पिके धोक्यात येत असून विहीर आणि बोअरवेलला पाणी आले नाही पावसावर लावलेला भाजीपाला पीक वाळून जात आहे.राधाकिशन यादव,भाजीपाला उत्पादक शेतकरी, बर्दापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.