Raigad News: रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) सर्वाधिक २१ जागा जिंकत बलाढ्य पक्ष म्हणून पुढे आली आहे. भाजपाचे १५ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला ३० चा बहुमताचा आकडा कोणत्याही पक्षाला गाठता आलेला नसल्याने आता सत्तेसाठी युती अपरिहार्य ठरणार आहे..या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील राजकीय चुरस विशेष लक्षवेधी ठरली. प्रचारापासून मतमोजणीपर्यंत रंगलेली ही लढत निकालानंतरही कायम आहे. महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) पुढे कोणाशी हातमिळवणी करणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना भाजपासोबत सत्ता स्थापन करणार की भाजप व राष्ट्रवादी एकत्र येणार, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. पंचायती समितीमध्येही शिवसेनेने मोठा विजय मिळवला असून १५ पैकी ६ पंचायत समित्यांमध्ये वर्चस्व निर्माण केले आहे..Solapur ZP Election Result 2026: माळशिरसमध्ये जानकरांना धक्का, संस्कृती सातपुते विजयी, पत्नीच्या विजयानंतर राम सातपुतेंनी दंड थोपटले.या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसला असून जिल्हा परिषदेत पक्षाचे खातेही उघडता आलेले नाही. पंचायत समिती स्तरावर मात्र पोलादपूर आणि अलिबाग येथे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले आहेत. .Parbhani ZP Election Results: परभणीकरांनी घराणेशाहीला नाकारलं, माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या कुटुंबातील चौघांचा पराभव.महाविकास आघाडीने उरण पंचायत समितीत चांगली कामगिरी केली असली तरी जिल्ह्याच्या इतर भागांत अपेक्षित प्रभाव दाखवता आलेला नाही. स्थानिक पातळीवर भाजपाने पेण आणि पनवेलमध्ये आपला गड अधिक मजबूत केला आहे. तर शिवसेनेने अलिबाग, महाड, माणगाव आणि पोलादपूरमध्ये प्रभाव वाढवला असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. स्पष्ट बहुमत नसल्याने पुढील काही दिवसांत सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचाली वेग घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..पक्षीय बलाबलपक्ष २०१७ २०२६शिवसेना १८ २१ठाकरे गट ० ५शेकाप २३ ०राष्ट्रवादी १२ १६काँग्रेस ३ २भाजप ३ १५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.