Raigad News : पाच महिन्यांपासून जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे, पण पर्जन्यमानाची सरासरी यंदा दरवर्षीपेक्षा १६ टक्क्यांनी कमी असल्याची आकडेवारी आहे. त्यामुळे एकीकडे पर्जन्यमान घटले असले तरी अतिवृष्टीने शेतकरी, मच्छीमार, पर्यटनाला मात्र फटका बसला आहे. .मे महिन्यात पडलेल्या पावसाचा आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला होता. त्याचबरोबर मच्छीमारांनाही शेवटच्या मासेमारी हंगामाचा फायदा उचलता आलेला नाही, मात्र या नुकसानीची कोणतेही मोजमाप नसल्याने आर्थिक नुकसान सोसावा लागत आहे. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात मोठे पूर आले नाहीत. .मोठी नैसर्गिक आपत्ती आली नाही तरी पावसाळ्यात ५२३ पक्क्या घरांचे, ९२ कच्च्या घरांचे, २० झोपड्यांचे नुकसान झाले. १२ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, तर चार जणांचा मृत्यू झाला. तसेच पावसाने दोन हजार १८५ हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे नुकसान केले..या पावसातही धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील २८ पैकी २६ लघुप्रकल्प १०० टक्के भरले आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये ६८.९४३ दक्षलक्ष घनमीटर इतके उपयुक्त पाणी उपलब्ध आहे..Crop Damage Survey : अहिल्यानगर जिल्ह्यात सत्तर टक्के पंचनामे पूर्ण.यंदा दक्षिण रायगडपेक्षा उत्तर रायगडात जास्त पाऊस पडला. अलिबाग, उरण, पेण, मुरूड या चार तालक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. अलिबाग तालुक्यात सरसरीच्या १११.५ टक्के नोंद झाली आहे..Crop Damage Compensation : अतिवृष्टिबाधितांना चौपट दराने मदत द्या.मॉन्सूनच्या कालावधीवरून नोंद१ जून ते ३० सप्टेंबर हा मॉन्सूनचा कालावधी समजला जातो. शासनाकडे चार महिन्यांच्या मॉन्सूनचा पाऊस म्हणून नोंद केली जाते. या चार महिन्यांमध्ये रायगड जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान तीन हजार १४८.६ मिलिमीटर आहे. जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत २६२६.८ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. वार्षिक सरासरीच्या ८३.७ टक्के पाऊस पडला आहे. यंदा चार महिन्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या १६ टक्के कमी पाऊस पडला आहे..तालुकानिहाय आकडेवारीतालुका पावसाची टक्केवारीअलिबाग १११.५पनवेल ९२.९कर्जत ७४.१खालापूर ९०.००उरण ११६.९सुधागड ८०.८पेण १०१.७महाड ८३.१माणगाव ८०.३रोहा ९३.७पोलादपूर ७२.८मुरूड १०६.५श्रीवर्धन ९४.३म्हसळा ९३.७तळा ९३.१एकूण ८३.७ टक्के .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.