Emergency Planning: मॉन्सून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना रायगड जिल्ह्यातील १३२ पूरप्रवण, ३९२ दरडप्रवण आणि ९९ समुद्रकिनारी गावे अजूनही संभाव्य आपत्तीच्या छायेखाली आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने व्यापक तयारीचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात अनेक महत्त्वाच्या उपाययोजना अद्याप अपूर्ण असल्याने मॉन्सूनपूर्व तयारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे..जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नुकत्याचझालेल्या बैठकीत सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या, मात्र बैठकीनंतर दीड महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही अनेक प्रकल्प अद्याप पूर्ण झालेलेे नाहीत. .Pre Monsoon Preparation: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर टंचाई उपाययोजनांचे नियोजन करा; आयुक्त कविता द्विवेदींचे निर्देश.आपत्ती सौम्यीकरणासाठी कोकण पॅकेजअंतर्गत एक हजार कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचा दावा केला जात असला तरी भूमिगत विद्युत वाहिन्या, बहुउद्देशीय निवारा केंद्रे, खारबांध बळकटीकरण आणि समुद्र धूपप्रतिबंधक बंधारे यांसारखी महत्त्वाची कामे अद्याप प्रगतिपथावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे..Kolhapur Administration Planning: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज ठेवा : जिल्हाधिकारी राठोड.जिल्ह्यातील २४० गावांमध्ये सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली कार्यान्वित झाल्याचा दावा जिल्हा आपत्ती प्राधिकरण करीत असले तरी जिल्ह्यातील सर्वच धोकाग्रस्त गावांपर्यंत ती अद्याप सुरू झालेली नाही. दुसरीकडे हजारो नागरिक आपत्तीच्या धोक्याखाली राहत असताना अनेक उपाययोजना अजूनही कागदावर आहेत..धोका कायमजिल्ह्यातील ३९२ दरडप्रवण गावांपैकी अनेक गावांमध्ये मॉन्सूनपूर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कितपत पूर्ण झाल्या आहेत, याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. दरवर्षी मुसळधार पावसात दरडी कोसळणे, रस्ते खचणे आणि गावांचा संपर्क तुटण्याच्या घटना घडत असतानाही धोका कायम असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.