Raigad News : अनेक प्रयत्नानंतरही रायगड जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांचे ई-केवायसी १०० टक्के होऊ शकलेले नाही. अनेक नागरिक नोकरी-व्यवसायानिमित्ताने बाहेरगावी राहत असल्याने त्यांचे ई-केवायसी पूर्ण न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर अशा नागरिकांसाठी पुरवठा विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. गणेशोत्सवादरम्यान ई-केवायसी न केल्यास शिधापत्रिकेवरील धान्याचा लाभ बंद झाल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची असणार, असा निर्वाणीचा इशाराही दिला आहे. .बाहेरगावी राहणारे अनेक जण आपल्या कुटुंबासमवेत गणेशोत्सवानिमित्त गावी आले आहेत. त्यामुळे या नागरिकांनी आपले ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन कुटुंबातील सर्व सदस्यांची ई-केवायसी तसेच सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी संबंधित लाभार्थ्यांशी संपर्क साधून व त्यांच्याकडे पोहोचून ई-केवायसी तत्काळ पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी केले आहे..ration Card e-KYC : लाखभर लाभार्थ्यांचे ई-केवायसी अपूर्ण.सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची (शिधापत्रिकाधारक) ई-केवायसी असणे शासनाने अनिवार्य केलेले आहे. लाभार्थ्यांचे शिधापत्रिकासोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे तसेच शिधापत्रिकेमध्ये नाव असलेल्या व्यक्ती त्याच आहेत,याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी यंत्रणा उपलब्ध करण्यात आली आहे. .शिधापत्रिकांसोबत संलग्न करण्यात आलेले आधार क्रमांकाचे प्रमाणिकर पूर्ण करण्यासाठी व रास्त भाव दुकान स्तरावर ई-केवासयी मोहीम राबविण्यात येत आहे. धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांची १०० टक्के ई-केवायसी करण्याबाबत सूचित केले आहे.\.Ration Card KYC : जालन्यात तीन लाख रेशन कार्डधारकांचे ‘केवायसी’ प्रलंबित .शिधापत्रिकाधारकांची संख्यारास्त भाव दुकाने- १४३८दारिद्र्य रेषेखालील - १. ०० (लाख)अंत्योदन अन्न योजना - ०. ८२ (लाख)दारिद्र्य रेषेवरील - ४. ९२ (लाख)शुभ्र - १. १४ (लाख)ई-केवायसी लाभधारक - ५. ०२ (लाख).वारंवार मुदतवाढ देऊनही रायगड जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांकडून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात उदासीनता दाखवण्यात येत आहे. यात सर्वाधिक प्रमाण हे दुसऱ्या जिल्ह्यात सहकुटुंब नोकरी करण्यासाठी गेलेल्या कोकणवासी कुटुंबीयांचे आहे. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ६९. ७ टक्केच ई-केवायसी पूर्ण झाली असून, ई-केवायसी करण्यासाठी अनेकवेळा मुदत देण्यात आलेली आहे. तरीही ई-केवायसी प्रक्रिया वेग धरू शकली नाही. शासनाकडून विविध मोहीम राबविण्यात आली होती.- सर्जेराव सोनावणे, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.