Fisheries Development: मासळीच्या घाऊक विक्रीकरिता मुंबईच्या डॉकवर करावे लागणारे रायगडमधील मच्छीमारांचे हेलपाटे आता थांबणार आहेत. उरण येथील करंजा बंदरात पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेतून १५० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक जेट्टीमुळे जिल्ह्यातच मासळी उतरवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या सुविधेमुळे रायगडच्या मत्स्य उत्पादनात सुमारे १० हजार मेट्रिक टनांची वाढ झाली आहे..जिल्ह्यात आणखी पाच-सहा अत्याधुनिक जेट्टी उभारल्यास मत्स्य उत्पादनासह मरीन उद्योगालाही मोठी चालना मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी व्यक्त केला. नियोजन भवनमध्ये नुकत्याच झालेल्या ‘जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२६’मध्ये मरीन उद्योगाला चालना देण्यासंर्भात सविस्तर चर्चा झाली. उपस्थित असलेल्या गुंतवणुकदारांनी यात गुंतवणूक करण्यात रस दाखवला आहे..Fish Production : पारदर्शकपणे काम करून मत्स्योत्पादनात वाढ करा.रायगड जिल्ह्यात दरवर्षी सुमारे ४५ हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादन होते, मात्र मासळी उतरवण्यासाठी जिल्ह्यात पुरेशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याने हजारो मच्छीमारांच्या बोटी मुंबई डॉकच्या दिशेने जात होत्या. तेथे मासळी उतरवण्यासाठी दोन-तीन दिवस बोटींना किनाऱ्यावर थांबावे लागत असल्याने मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते..Fishing Season 2026: मासेमारीला ७६ दिवसांनी प्रारंभ.मासळी खराब होण्याबरोबरच कोळीबांधवांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. मरीन उद्योगातील ही मोठी समस्या रायगड जिल्ह्यातील वरसोली, साखर-आक्षी, आगरदांडा, जीवनाबंदर येथीलही मच्छीमारांना सातत्याने जाणवत होती. करंजा जेट्टीमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत झाली आहे. आता रायगडमधील मच्छीमारांना जिल्ह्यातच मासळी उतरवता येत असल्याने मुंबईपर्यंतचा प्रवास, वाहतूक खर्च आणि वेळ वाचत आहे..रोजगारनिर्मितीतही वाढउत्पादन वाढण्याबरोबरच मासळी प्रक्रिया, शीतगृह, वाहतूक आणि निर्यात यांसारख्या पूरक उद्योगांनाही चालना मिळू शकते. परिणामी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याची शक्यता आहे..करंजा बंदरातील जेट्टीमुळे रायगडच्या मत्स्य उत्पादनात १० हजार मेट्रिक टनांची वाढ झाली आहे. रायगड हा मत्स्य उत्पादनात महाराष्ट्रातील आघाडीचा जिल्हा असून ४५ हजार मेट्रिक टन उत्पादनावर समाधान न मानता ते आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी जिल्ह्यात आणखी पाच-सहा अत्याधुनिक जेट्टी उभारल्यास मच्छीमारांना मासळी उतरवण्यासाठी स्थानिक पातळीवर सुविधा मिळतील.किशन जावळे, जिल्हाधिकारी रायगड.मच्छीमारांना दीर्घ, मध्यम मुदतीचे कर्ज सुलभपणे मिळत नाही, त्यासाठीही उपाययोजना आखण्याचा प्रयत्न सरकार पातळीवर केला जात आहे. त्याचा फायदा जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांना होणार आहे.भरत गोगावले, पालकमंत्री रायगड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.