Insurance Delay: लहरी हवामान आणि अवकाळी पावसाने रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळ विमा योजनेअंतर्गत पाच हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी विमा उतरवूनही एक रुपयाचीही नुकसानभरपाई मिळालेली नाही, तर सात हजार हेक्टर भातपिकाचाही फटका बसला आहे.