Smart Farming: सामान्य सल्लाहवामान अंदाज आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमानाकरीता मेघदूत मोबाइल अॅपचा वापर करावा.विजेच्या अंदाजाचा पूर्वानुमानाकरिता दामिनी मोबाइल अॅपचा वापर करावा.गरजेनुसार पिकांमध्ये कोळपणी करून पीक तणमुक्त ठेवावे. .ऊसऊस पिकामध्ये उपलब्ध पाण्याचा प्रभावी वापर होण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. ठिबक सिंचनाद्वारे दिवसाआड पाणी द्यावे. जर ऊस प्रवाही पद्धतीवर असेल (पाण्याच्या उपलब्धतेनुसार) तर एकआड सरी प्रमाणे पाणी द्यावे.कापूसपेरणीनंतर कापसाची सर्वसाधारणपणे १० दिवसांत उगवण होते. ज्या ठिकाणी अद्याप उगवण झाली नसेल त्या ठिकाणी राखून ठेवलेल्या बियाण्यापासूनच, त्याच वाणाचे बियाणे नांग्या भरण्यासाठी वापरावे व लगेच पाणी द्यावे. त्यानंतर १५ दिवसांनी प्रत्येक फुलीवर दोनच जोमदार रोपे ठेवून बाकीची रोपे उपटून टाकावीत..Crop Advisory: कृषी सल्ला (कोकण विभाग).मूग, उडीदमूग, उडीद पिकात २० ते २५ दिवसांनी कोळपणी करून घ्यावी. तणांचे नियंत्रण करण्यासाठी निंदणी करावी.मकाउगवण झाल्यानंतर ८ ते १० दिवसांनी पहिली कोळपणी करून घ्यावी. गरजेनुसार नांगे भरणी करून घ्यावी. आवश्यकतेनुसार तण नियंत्रणासाठी खुरपणी करणे..Crop Advisory: कृषी सल्ला (कोकण विभाग).भुईमूगउगवण झाल्यानंतर १० ते १२ दिवसांनी कोळपणी करून घ्यावी. आवश्यकतेनुसार बी टोकून नांग्या भराव्यात.जमिनीत ओलावा टिकविण्यासाठी, हवा खेळती राहण्यासाठी तसेच गवताचे व तणांचे नियंत्रण करण्यासाठी हात कोळप्याने कोळपणी करून घ्यावी.तूरतुरीमध्ये शक्य असल्यास ज्वारी किंवा मका यांचे मिश्रपीक घ्यावे. हे मिश्रपीक सजीव पक्षिथांबे म्हणून उपयोगी येतात. त्यामुळे किडीच्या नैसर्गिक शत्रू कीटकांची जोपासना होण्यास मदत होते. शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी मचाण म्हणजेच इंग्रजी ‘टी’ आकाराचे पक्षिथांबे हेक्टरी ५० ते ६० प्रमाणे उभारावेत..पशुसंवर्धनपावसाळ्यात जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत. पशुपालकांनी आपल्या भागात कोणत्या प्रकारचे जंत आहेत, याची माहिती करून घ्यावी. जंतांचे प्रकार जाणून घेण्यासाठी जनावरांच्या शेणाची तपासणी करावी. जंतांचे प्रकार समजल्यावर पशुवैद्यकाच्या मदतीने नियंत्रणासाठी व प्रतिबंधात्मक उपायांसाठी योग्य उपाययोजना कराव्यात..जनावरांची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोषक घटकांचा आहारात समावेश करून संतुलित आहार द्यावा.जनावरांचा गोठा कायम स्वच्छ, कोरडा व हवेशीर ठेवावे. गोठ्याचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे.०२४२६-२४३२३९(ग्रामीण कृषी मौसम सेवा व कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.