Parliament Budget Session Updates Rahul Gandhi On India US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार करारावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ''अमेरिकेने अटी घालून, भारताला रशियाकडून तेल खरेदी करू नका असे सांगितले आणि शुल्क १८ टक्क्यांवर ठेवले, तर भारताने शुल्क शुन्यावर आणले. तुम्ही देश विकला. तुम्हाला भारत विकल्याची लाज वाटत नाही का? तुम्ही भारतमातेला विकले. देशातल्या शेतकऱ्याला विकले. इतिहासात पहिल्यांदाच आपल्या देशातील शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत; तुम्ही गरीब शेतकऱ्यांना चिरडून टाकण्यासाठी दरवाजे खुले केले आहेत, आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी असे कधीच केले नव्हते," अशा शब्दांत राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली..केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना राहुल गांधी यांनी, भारत-अमेरिका करारात देशातील शेतकऱ्यांचे हित पायदळी तुडवल्याचा गंभीर आरोप केला. अमेरिका आणि चीनच्या तुलनेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचा डेटा. जर अमेरिकेला महासत्ता म्हणून स्थान कायम राखायचे असेल तर त्यांना त्यांचा डॉलर वाचवणे आणि भारताचा डेटा ही अमेरिकन लोकांसाठी खूप महत्त्वाची बाब असल्याचे राहुल गांधी यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. .“तुम्ही यांत्रिकीकृत अमेरिकेच्या शेतीसाठी देशाचे दार खुले केले आहे. तुम्ही आमच्या गरीब शेतकऱ्यांना चिरडून टाकण्यासाठी देशाची बाजारपेठ खुली केली आहे, ही लज्जास्पद बाब आहे”, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर प्रहार केला.''ही पूर्णपणे शरणागती आहे. ही एक शोकांतिका आहे. कारण ही केवळ पंतप्रधानांची शरणागती नव्हे तर त्यांनी १.५ अब्ज भारतीयांना अमेरिकेपुढे झुकवले आहे. त्यांनी शरणागती पत्करली आहे कारण त्यांना भाजपच्या आर्थिक रचनेचे रक्षण करायचे आहे, ज्यावर अमेरिकेत खटला सुरू आहे..." असा गौप्यस्फोट त्यांनी केला. .India-US Trade Deal : द्विपक्षीय व्यापार कराराबाबत 'व्हाईट हाऊस'चं पत्रक; करारातले मुद्दे केले स्पष्ट.''मला माहित आहे की सामान्य परिस्थितीत पंतप्रधान भारताला विकू देणार नाहीत. तुम्हाला माहिती आहे का? त्यांनी देशाला का विकले? कारण ते त्यांच्यावर दबाव आणत आहेत... आम्हाला पंतप्रधानांच्या डोळ्यात भीती दिसते. दोन गोष्टी आहेत, पहिली म्हणजे, एपस्टीन! ३० लाख फायली अजूनही बंद आहेत..." असा धक्कादायक दावा गांधी यांनी केला..India US Trade Deal: ट्रम्पशाहीत भारतातील शेतकरी तरणार की देशोधडीला लागणार?.अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान बोलताना गांधी यांनी पुढे म्हटले की, भू-राजकीय संघर्ष आणि आर्थिक शस्त्रीकरणाच्या युगात भारताने आपल्या देशातील लोक, डेटा, ऊर्जा आणि अन्न प्रणालींचे संरक्षण केले पाहिजे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.