रब्बी हंगामातील गहू आणि इतर पिकांची पेरणी पूर्णपोषक वातावरणामुळे गहू पीक क्षेत्र विक्रमी ३३४.१ लाख हेक्टरवरयंदा गहू पीक क्षेत्रात ६.१ लाख हेक्टरने वाढरब्बीतील पीक कापणीला मार्चपासून सुरुवात होईल.Rabi Wheat Sowing Acreage Increase: रब्बी हंगामातील गहू आणि इतर पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. पोषक वातावरणामुळे देशातील रब्बी हंगामातील गव्हाचे पीक क्षेत्र विक्रमी ३३४.१ लाख हेक्टरवर व्यापले आहे. गहू पिकाखालील एकूण क्षेत्र गेल्या वर्षीच्या ३२८ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा ६.१ लाख हेक्टरने वाढले आहे, असे कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. रब्बीतील पीक कापणीला मार्चपासून सुरुवात होईल..मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२५-२६ मधील रब्बी हंगामात कडधान्ये पीक क्षेत्रात किरकोळ वाढ होऊन ते १३७ लाख हेक्टरवर विस्तारले आहे. मागील वर्षी कडधान्ये पिकाखालील क्षेत्र १३३ लाख हेक्टरवर होते. कडधान्यांमध्ये, हरभरा लागवडीचे क्षेत्र ९१.२ लाख हेक्टरवरून ९५.८ लाख हेक्टरवर पोहोचले आहे..Rabi Season: रब्बी हंगामात आशेची हिरवळ.भरडधान्ये पीक क्षेत्र ५५.९ लाख हेक्टरवरून ५८.७ लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे. त्यात मक्याच्या २७.५ लाख हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. तेलबिया पिकाखालील क्षेत्र वाढून ९६.८ लाख हेक्टरवर आहे. मागील हंगामात हे क्षेत्र ९३.३ लाख हेक्टरवर होते..एकूण रब्बी पिकांची पेरणी ६५२.३ लाख हेक्टरवर झाली आहे, जी मागील वर्षीच्या ६३१.४ लाख हेक्टरच्या तुलनेत ३.३१ टक्क्यांनी अधिक आहे. कर्नाल येथील भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्थेच्या माहितीनुसार, गहू पेरणी आता पूर्ण झाली आहे. पोषक हवामानामुळे पिकाच्या वाढीस आणि मशागतीसाठी मदत मिळत आहे..Rabi Sowing: रब्बी पेरणी ९९ टक्क्यांवर.१,७११.४ लाख टन धान्य उत्पादनाचे उद्दिष्टकेंद्र सरकारने २०२५-२६ रब्बी हंगामातून १,७११.४ लाख टन धान्य उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यात १,१९० लाख टन गहू, १५८.६ लाख टन भात, १६५.७ लाख टन कडधान्ये, ३१.७ लाख टन तृणधान्ये, १४५ लाख टन मका आणि २० लाख दशलक्ष टन बार्ली, तसेच १५०.७ लाख टन तेलबिया यांचा समावेश आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.