सामान्य क्षेत्रांच्या तुलनेत ६२ टक्के क्षेत्रावर रब्बी पीक पेरणी पूर्ण मोहरी पेरणी आघाडीवर, सामान्य क्षेत्राच्या तुलनेत ९७ टक्के क्षेत्र व्यापलेहरभरा, गहू पेरणी अनुक्रमे ६२ टक्के, ६० टक्के क्षेत्रावरसर्व शेतपिकांखालील एकूण क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.९ टक्क्यांनी आघाडीवर .Rabi Sowing: जमिनीत पुरेसा ओलावा, अनुकूल हवामान आणि लवकर सुरुवात केल्यामुळे देशातील शेतकऱ्यांनी यावर्षी सामान्य क्षेत्रांपैकी ६२ टक्के क्षेत्रावर रब्बी पीक पेरणी पूर्ण केली आहे. रब्बी हंगामातील प्रमुख तेलबिया पीक असलेल्या मोहरी पिकाने (Mustard) सामान्य क्षेत्राच्या तुलनेत ९७ टक्के क्षेत्र व्यापले आहे. तर हरभरा आणि गहू पेरणी सामान्य क्षेत्राच्या तुलनेत अनुक्रमे ६२ टक्के आणि ६० टक्के क्षेत्रावर झाली असल्याचे कृषी मंत्रालयाच्या (Agriculture Ministry) ताज्या आकडेवारीवरुन दिसून आले आहे..२८ नोव्हेंबरपर्यंत सर्व शेतपिकांखालील एकूण क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.९ टक्क्यांनी आघाडीवर असून ते ३९३.०७ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीतील ३५७.७३ लाख हेक्टरवर पीक पेरणी झाली होती, असे कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. .२८ नोव्हेंबरपर्यंत गहू पेरणी १८७.३७ लाख हेक्टरवर झाली होती. गेल्या वर्षी या पिकाखालील क्षेत्र १६०.२६ लाख हेक्टरवर होते. मागील पाच वर्षांतील सरासरी पाहता सर्व रब्बी पिकांखालील सामान्य क्षेत्र ६३७.८१ लाख हेक्टरवर असते..Rabi Sowing: नांदेड जिल्ह्यात प्रकल्पांच्या पाण्यामुळे रब्बी पेरणीला वेग.रब्बी हंगामातील भात पेरणी क्षेत्र ७.७ टक्क्यांनी आघाडीवर असून ते ८.४५ लाख हेक्टरवरून ९.१० लाख हेक्टरवर पोहोचले आहे. मका पिकाखालील क्षेत्र २०.८ टक्क्यांनी आघाडीवर आहे. हे पीक क्षेत्र ७.२५ लाख हेक्टरवरून ८.७६ लाख हेक्टरपर्यंत व्यापले आहे. बार्ली पीक पेरणी ४.२७ लाख हेक्टरच्या तुलनेत ४.६० लाख हेक्टरवर झाली आहे. तर ज्वारी पेरणी १४.९८ लाख हेक्टरवर झाली आहे. भरड धान्याखालील पीक क्षेत्रात ९.३ टक्के आघाडीवर असून एकूण क्षेत्र २९.०६ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. झाले. गेल्या वर्षी याच कालावधीत २६.५८ लाख हेक्टरवर पीक क्षेत्र होते. .जमिनीतील ओलाव्यामुळे रब्बी पीक पेरणीला गतीकडधान्यांची पेरणी ८७.०१ लाख हेक्टरवर झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ८५.०६ लाख हेक्टरवर पेरणी क्षेत्र होते. हरभरा पीक क्षेत्र ३.९ टक्क्यांनी आघाडीवर आहे. हे पीक क्षेत्र ६२.४९ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. मसूर पेरणीही ९.४ टक्के आघाडीवर असून या पिकाने ११.४२ लाख हेक्टर क्षेत्र व्यापले आहे..Rabi Sowing: गव्हाचा ४७ हजार हेक्टरवर पेरा.तेलबिया पीक पेरणी ८०.५३ लाख हेक्टरवर झाली आहे. या पिकाची पेरणी गेल्या वर्षीच्या ७७.३८ लाख हेक्टरच्या तुलनेत ४.१ टक्क्यांनी आघाडीवर आहे. मोहरी पीक क्षेत्र ७७.०६ लाख हेक्टरवर असून ते गेल्या वर्षीच्या ७२.९२ लाख हेक्टरच्या तुलनेत ५.७ टक्के आघाडीवर आहे, कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते..कर्नाल येथील भारतीय गहू आणि बार्ली संशोधन संस्थेने (IIWBR) म्हटले आहे की, देशभरात गहू पेरणी वेगाने सुरु आहे. जमिनीतील पुरेसा ओलावा आणि यंत्राद्वारे पेरणी केल्यामुळे वेळ, बियाणे आणि मनुष्यबळावरील खर्च वाचतो. यापूर्वी, शेतकऱ्यांना २० नोव्हेंबरपर्यंत गहू पेरणी पूर्ण करण्यास सांगण्यात आले होते..हवामान अनुकूल पीक वाणांची निवड करावी"ज्या शेतकऱ्यांनी अद्याप रब्बी पीक पेरणी केलेली नाही त्यांनी पेरणीचा वेळ आणि शेती हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन वाणांची निवड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जेणेकरून त्यांना अधिक उत्पादन घेता येईल. शेतकऱ्यांना पेरणीचा कालावधी आणि सिंचनाच्या व्यवस्थेनुसार, अधिक उत्पादन देणाऱ्या, हवामान अनुकूल पीक वाणांची निवड करावी आणि नेहमी विश्वासार्ह स्त्रोतांकडून बियाणे खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे," असे १ ते १५ डिसेंबरच्या पंधरवड्यासाठीच्या सल्लागारात नमूद केले आहे..ज्या शेतकऱ्यांनी ऑक्टोबरमध्ये गहू पेरणी केली आहे; त्यांना जोमदार पीक यावे यासाठी वेळेवर तण नियंत्रण आणि सिंचन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गहू पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी पिकाची योग्य आणि एकसारख्या उगवणीकडे विशेष लक्ष द्यावे आणि त्यांनी पहिले सिंचन पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी द्यावे, असेही नमूद केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.