Buldhana News: या वर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात पेरणीसाठी अजूनही फारशी गती घेतलेली नाही. हवामानातील अनिश्चितता, थंडीचा उशीर आणि काही भागांत जमिनीतील ओलावा या कारणांमुळे लागवड अपेक्षित गतीने सुरू झालेली नाही. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत केवळ चार टक्के क्षेत्रावरच रब्बी पिकांची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे..जिल्ह्याचे एकूण सरासरी रब्बी क्षेत्र तीन लाख २९ हजार हेक्टर इतके आहे. यंदा प्रकल्पांमधील उपलब्ध जलसाठा, हवामान व जमिनीतील पोषक परिस्थिती लक्षात घेऊन कृषी विभागाने तीन लाख ८७ हजार हेक्टरवर पेरणीचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र आजवर केवळ १० हजार ७२० हेक्टरवरच प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे..Rabi Crop Sowing : सांगली जिल्ह्यात रब्बीचा पेरा पोहोचला २७ टक्क्यांवर.कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की गेल्या काही दिवसांपासून वातावरणात थोडा गारवा वाढत असल्याने आणि ओलाव्याची स्थिती सुधारल्याने नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून लागवडीला वेग येण्याची अपेक्षा आहे. विशेषतः हरभरा आणि गहू या प्रमुख रब्बी पिकांची पेरणी पुढील आठवड्यापासून जोरात सुरू होईल. या वर्षीच्या रब्बी हंगामासाठी पाण्याची परिस्थिती समाधानकारक आहे. तरी शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे आणि शिफारशीत खतांचा वापर करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. एकंदरीत, रब्बी हंगामाची सुरुवात संथ असली तरी नोव्हेंबर अखेरपर्यंत लागवडीला अपेक्षित गती येण्याची चिन्हे आहेत..Rabi Sowing: रब्बीचा पेरा आघाडीवर; हरभरा, गव्हासह मोहरीकडे शेतकऱ्यांचा कल.यंदाही हरभऱ्यावरच भररब्बी हंगामात शेतकऱ्यांना हरभऱ्याच्या पिकाला सक्षम पर्याय भेटलेला नाही. यंदाच्या हंगामातही हरभऱ्याचीच सुमारे २ लाख ६० हजार हेक्टरवर लागवड होणे अपेक्षित आहे. हरभऱ्याची लागवड सध्या सुरू झालेली आहे. हळूहळू त्याला गती येईल, असे सांगितले जात आहे. यावर्षी पाऊस लांबल्याने रब्बी लागवडीला विलंब होत आहे. ऑक्टोबरच्या शेवटी पाऊस झाल्याने नियोजनात बरेच अडथळे आलेले आहेत. आता पाऊस थांबल्यानंतर वाफसा तयार होऊ लागला. त्यामुळे सुरुवातीची मशागत जोमाने केली जात आहे. .आतापर्यंत झालेली लागवडज्वारी ३२१ हेक्टर (१.९९ टक्का)गहू ७१४ हेक्टर (१.०७ टक्का)मका १,४९४ हेक्टर (८.५६ टक्के)हरभरा ८,१५१ हेक्टर (३.५९ टक्के).नियोजित लागवडीचे क्षेत्रगहू ७८,००० हेक्टरहरभरा २,६०,१०० हेक्टरमका ३२,००० हेक्टर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.