Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा रब्बीची आतापर्यंत ९२.९३ टक्के पेरणी झाली आहे. गव्हाचे क्षेत्र यंदा वाढत असून आतापर्यंत सरासरीच्या ११४.८३ टक्के पेरणी झाली आहे. मात्र रब्बीची एकूण पेरणी गतवर्षीच्या तुलनेत कमी झाली आहे..जिल्ह्यात रब्बीचे ४ लाख ४९ हजार ६६७ हेक्टर रब्बीचे सरासरी क्षेत्र असून, आतापर्यंत ४ लाख १७ हजार ८७६ हेक्टर क्षेत्रावर (९२.९३ टक्के) पेरणी झाली आहे. ज्वारी, गहू, मका, इतर तृणधान्ये, करडई, जवस, तीळ, सूर्यफूल आदी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. यंदा आतापर्यंत ज्वारीची १ लाख १९ हजार ५९५ हेक्टर (७३.९१ टक्के) पेरणी झाली आहे..Rabi Sowing: रब्बीचा पेरा ६३४ लाख हेक्टरवर.गहू पिकाचे क्षेत्र सर्वाधिक असून, आतापर्यंत १ लाख ४७ हजार ५०७ हेक्टर (११४.८३ टक्के) पेरणी झाली आहे. यंदा मक्याचे क्षेत्रही बऱ्यापैकी पेरले गेले आहे. यंदा मक्याची सुमारे ५० हजार ५२५ (१०४ टक्के) पेरणी झाली आहे. हरभऱ्याची ९८ हजार ३०९ (९०.७४ टक्के) पेरणी झाली आहे. करडई, तीळ, सूर्यफूल, जवस या गळीत धान्यांची संपूर्ण जिल्हाभरात केवळ २८४ हेक्टर म्हणजे सरासरीच्या ४०.५९ टक्के पेरणी झाली आहे. मागील वर्षी ती ६२.४९ टक्के होती..करडई, जवस, तीळ आणि सूर्यफूल या पिकांच्या पेरणीत मोठी घसरण झाली आहे. विशेष म्हणजे जवसाची पेरणी अवघ्या सहा हेक्टरवर मर्यादित राहिली आहे. तीळ व करडईच्या घटलेल्या पेरणीमुळे भविष्यात तेलबियांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऊस नवीन लागवड सरासरीच्या केवळ ६९.३७ टक्के झाली असून, मागील वर्षी ती ९४.२७ टक्के होती..Rabi Sowing: जळगावात रब्बीच्या क्षेत्रात वाढ.पाणीटंचाई, ऊस तोडणीतील अडचणी आणि साखर कारखान्यांशी संबंधित अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे. अहिल्यानगर, शेवगाव, नेवासा, अकोले, कोपरगाव, तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पेरणी झाली आहे. गव्हाचे क्षेत्र वाढत असल्याने अजून पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे..तालुकानिहाय रब्बी पेरणी (टक्के)अहिल्यानगर ः १००.१८, पारनेर ः ७८.७५, श्रीगोंदा ः ८३.८७, कर्जत ः ८६.७३, जामखेड ः ८९.०५, शेवगाव ः १०६.३१, पाथर्डी ः ९५.५७, नेवासा ः १०७.०८, राहुरी ः ८५.०७, संगमनेर ८१.७४, अकोले ः १११.६८, कोपरगाव ः १२१.६६, श्रीरामपूर ः९६.०५, राहाता ः ९६.६८..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.