Nashik News: नाशिक जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व मान्सूनोत्तर पावसामुळे यंदा रब्बी पेरणीचे नियोजन कोलमडले होते. परिणामी दर वर्षीच्या तुलनेत यंदा पेरणी लांबणीवर गेली. मात्र टप्प्याटप्याने उशिरा पेरणी झाली असून सरासरीपेक्षा अधिक पेरा झाला आहे. ही टक्केवारी ११४ असून गहू पेरणी सरासरीपेक्षा अधिक व मक्याची दुप्पट असल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून समोर आले आहे..जिल्ह्याची रब्बी पेरणीची सरासरी १ लाख १४ हजार १५ हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख ३० हजार १३३ हेक्टरवर पेरणी असून ही टक्केवारी ११४ टक्के आहे..Rabi Sowing: खानदेशात रब्बीचा पेरा ११० टक्के.१९ जानेवारी अखेर अहवालानुसार जिल्ह्याचा पेरणीचा टप्पा समाधानकारक स्थितीत पोहोचला आहे. विशेषतः तृणधान्यांच्या पेरणीत मोठी वाढ झाली असून, गव्हाची पेरणी १०० टक्क्यांच्या पार आहे. कृषी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात गव्हाचे सरासरी क्षेत्र ६४ हजार २३३ हेक्टर असताना प्रत्यक्षात ७० हजार २९३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ही टक्केवारी १०९ इतकी आहे. .Rabi Sowing: रब्बी पेरणी ९९ टक्क्यांवर.यामध्ये बागलाण, त्रंबकेश्वर व निफाड वगळता तालुक्यांनी सरासरी पेरणीचा आकडा ओलांडला आहे. सिन्नर, नाशिक, नांदगाव, येवला व देवळा या चार तालुक्यांत क्षेत्रवाढ दिसून आली. चांदवड, पेठ, इगतपुरी, कळवण, मालेगाव तालुक्यात सरासरीचा आकडा ओलांडला आहे. निफाड हा जिल्ह्यातील प्रमुख गहू उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो.मात्र यंदा येथे सरासरीच्या तुलनेत ७ टक्के कमी पेरणी आहे. मात्र जिल्ह्यात सर्वाधिक पेरा येथे आहे..मक्याच्या पेरणीत मोठी वाढ झाली असून २२ हजार ९२४ हेक्टर क्षेत्रावर मका पेरला गेला आहे. ही टक्केवारी २४६ टक्के आहे. नांदगाव, नाशिक, निफाड, सिन्नर, येवला व चांदवड तालुक्यात पेरणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तर ज्वारीची पेरणी अवधी ६६ टक्के झाली आहे. मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, दिंडोरी, सिन्नर व येवला तालुक्यात २ हजार ७६६ हेक्टर पेरणी झाली आहे. कडधान्य पिकत हरभऱ्याचे क्षेत्रही सरासरीच्या उंबरठ्यावर आहे. २९ हजार ७९४ हेक्टरवर ८९ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सिन्नर तालुक्यात सर्वाधिक ६ हजार ९४६ हेक्टर पेरणी आहे. याशिवाय मालेगाव, कळवण, सुरगाणा, इगतपुरी येथे सरासरीपेक्षा अधिक पेरणी आहे. पेरणीमध्ये मालेगाव, सिन्नर, निफाड आणि येवला या तालुक्यांनी आघाडी घेतली आहे..पीकनिहाय पेरणी (क्षेत्र हेक्टरमध्ये)पीक सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी टक्केवारीगहू ६४,२३३ ७०,२९३ १०९मका ९२८४ २२,९२४ २४६ज्वारी ४,२२० २,७६६ ६५हरभरा ३३,३५७ २९,७९४ ८९.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.