Latur News: कृषी विभागाच्या लातूर विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यात सध्या रब्बीच्या पेरण्यात आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. हंगामात यंदा उशिरापर्यंत पाऊस सुरु राहिल्याने पेरण्यांचा वेग मंदावला होता. मागील आठवड्यात पेरण्या वेगाने झाल्या. .आठवडाभरात विभागात सुमारे साडेतीन लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या असून आठवड्यात पेरणीचे क्षेत्र २३ टक्क्यांनी वाढून ७८ टक्क्यावर गेले आहे. हंगामातील राहिलेल्या पेरण्या या आठवड्यात होण्याची आशा कृषी विभागाला आहे.विभागात रब्बी पिकाचे सरासरी क्षेत्र १५ लाख नऊ हजार २०७ हेक्टर असून आतापर्यंत ११ लाख ८० हजार ८६४ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत..पेरणी अजूनही सुरु असून शेतकरी वेगाने ती उरकत आहेत. उशिरापर्यंत सुरु राहिलेल्या पावसामुळे काही तालुक्यात वापसा होण्यास उशीर झाला.यात उशिराने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी व मळणीचे कामेही याच आठवड्यात आली. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना रब्बीसाठी मशागत करण्यास वेळच मिळाला नाही. मागील आठवड्यात मात्र, शेतकऱ्यांना मोठी उसंत मिळाली..Rabi Sowing: गव्हाचा ४७ हजार हेक्टरवर पेरा.यामुळे एका आठवड्यात वेगाने पेरण्या पूर्ण झाल्या. पेरणी झालेल्या पैकी रब्बी, हरभरा, गहू व करडईचे पिके उगवणीच्या ते रोप अवस्थेत आहेत.यात यंदाही हरभराची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर झाली असून अनुकूल परिस्थिती पहाता यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत हरभराचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. टक्के झाली असून विभागात ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र तीन लाख ३६ हजार ९५६ हेक्टर असून..Onion Export Ban: कांदा निर्यातीवर चर्चेची मागणी; खासदार सुळे आणि कोल्हेंचं निलंबन! | ॲग्रोवन.हरभराचे सर्वसाधारण क्षेत्र नऊ लाख ७१ हजार ७६१ हेक्टर असून आतापर्यंत आठ लाख ३०२ हेक्टरवर (८२ टक्के) झाली आहे.त्यानंतर ज्वारीचीही पेरणी ७५..आतापर्यंत दोन लाख ५१ हजार २३६ हेक्टरवर ज्वारीच्या पेरण्या झाल्या आहेत. गव्हाच्या एक लाख ४९ हजार १७७ पैकी ९४ हजार २१६ हेक्टरवर (६३ टक्के) पेरणी झाली आहेत. करडईच्या २२ हजार ६३७ हेक्टरपैकी १६ हजार ३९६ हेक्टरवर (७२ टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.