Latur News: कृषी विभागाच्या लातूर विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यांत सध्या रब्बीच्या पेरण्यांनी वेग घेतला आहे. उशिरापर्यंत पाऊस पडून जमिनीतील ओल कमी न झाल्यामुळे (वाफसा) पेरण्यांना उशीर झाला. पेरणीपूर्व मशागतीच्या कामातही मोठा अडथळा आला. .यामुळे यंदा रब्बीच्या पेरण्यांना उशीर होत असल्याचे चित्र आहे. या स्थितीत विभागात रब्बीच्या पेरण्या ५५ टक्के क्षेत्रावर झाल्या आहेत. विभागात रब्बीचे सरासरी क्षेत्र १५ लाख नऊ हजार २०७ हेक्टर असून सध्या आठ लाख ३० हजार ३०६ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत..Rabi Season: शेतकऱ्यांना रब्बीचा आधार.विभागात पाऊस उशिरापर्यंत सुरू राहिल्याने जमिनीतील ओल लवकर कमी झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांना मशागत करण्यास अडचण निर्माण झाली होती. त्याचा परिणाम रब्बी पेरण्यांना उशीर होत आहे. लातूर व परभणी जिल्ह्यात साठ टक्के तर हिंगोली व नांदेड जिल्ह्यात ४५ टक्क्याच्या पुढे पेरण्या झाल्या आहेत..धाराशिव जिल्ह्यात ५७ टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. काही भागात रब्बी ज्वारी, हरभरा, गहू व करडई पीक उगवणीच्या ते रोप अवस्थेत आहे. दरम्यान खरीप लातूर विभागातील खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र २८ लाख ३० हजार ७०७ हेक्टरपैकी प्रत्यक्ष अंतिम पेरणी २७ लाख ७४ हजार १६० हेक्टरवर (९८ टक्के) झाली आहे..Rabi Sowing: तीन जिल्ह्यांत किंचित वाढली रब्बी पेरणीची गती.विभागात खरीप ज्वारी, बाजरी, तूर, मुग व उडीद पिकाखालील क्षेत्रामध्ये घट झाली असून हे सर्व क्षेत्र सोयाबीन पिकाखाली आले आहे. यंदा सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. तूर पीक फुलोरा व शेंगा लागणे ते भरणेच्या अवस्थेत आहेत. खरिपातील ज्वारीची काढणी अंतिम टप्प्यात आहे. सोयाबीन, मुग व उडदाची काढणी शंभर टक्के झाली असून कापसाची पहिली वेचणी अंतिम टप्प्यात आहे. कापसावर आकस्मिक मर रोगाचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येत आहे. तसेच तूर पिकावर पाने गुंडाळणारी अळीचा व मर रोगाचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव आहे..जिल्हानिहाय रब्बीच्या पेरण्याजिल्हा सरासरी पेरणी क्षेत्र (हेक्टर) प्रत्यक्ष पेरणीलातूर ३,१८,६८८ १,९२,३०४ ६०.३४धाराशिव ४,१७,९०२ २,४१,११४ ५७.७०नांदेड ३,३२,४१६ १,५०,२८६ ४५.२१परभणी २,७०,९७९ १,६४,२५० ६०.६१हिंगोली १,६९,२२२ ८२,३२२ ४८.६५एकूण १५,०९,२०७ ८,३०,३०६ ५५.०२.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.