Latur News: कृषी विभागाच्या लातूर विभागातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यांत सध्या रब्बीच्या पेरण्या आता शंभर टक्क्याच्या पुढे गेल्या आहेत. यंदा उशिरापर्यंत पाऊस सुरु राहिल्याने पेरण्यांना उशीर झाला तरी यंदा उद्दिष्टापेक्षा रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. काही दिवसापासूनच्या ढगाळ वातावरणाचा फटका रब्बीच्या पिकांना बसण्याची शक्यता आहे. .हरभरा व गव्हाच्या पेरण्याही शंभर टक्क्याच्या पुढे गेल्या ज्वारीच्या क्षेत्र शंभर टक्क्याच्या आसपास आहे. दरम्यान यंदा मकाचे क्षेत्रात दोन हजार ३१३ हेक्टरने वाढ झाली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत सर्वच पिकांच्या पेरणी क्षेत्रात घट दिसून येत आहे. रब्बीचे पिके सध्या वाढीच्या व फुलोरा तसेच गव्हाचे पीक ओंब्या भरण्याच्या अवस्थेत आहेत. काही भागात हरभरा पिकांवर मर रोग व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे..खरिपातील तूर सध्या पक्वतेच्या अवस्थेत असून दहा ते पंधरा टिके पिकाची काढणी पूर्ण झाली आहे. कापूस पिकाची वेचणी पूर्ण झाली आहे. लातूर विभागात रब्बीचे सरासरी क्षेत्र १५ लाख नऊ हजार २०७ हेक्टर असून आतापर्यंत १६ लाख ५९ हजार ९१३ हेक्टरवर (११० टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. धाराशिव व नांदेड जिल्हयात हरभरा पिकावर मर रोगाचा व पाने खाणाऱ्या अळीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येत आहे. रब्बी ज्वारी पीक वाढीच्या ते काही ठिकाणी पोटरी अवस्थेत आहे..Rabi Sowing: सांगली जिल्ह्यात रब्बीचा शंभर टक्के पेरा.हरभरा पीक फुलोरा अवस्थेत आहे. गहु पीक वाढीच्या ते काही ठिकाणी ओंब्या भरणेच्या अवस्थेत असून करडई पीक वाढीच्या अवस्थेत आहे. गेल्यावर्षी १७ लाख ३६ हजार ६७२ हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या झाल्या होत्या. यात मका पिकाची पेरणी २६ हजार ५९९ हेक्टरवर (१४८) टक्के झाली असून गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे..Rabi Sowing: गुजरातमध्ये रब्बीचा विक्रमी पेरा, गहू, हरभरा, मक्याला शेतकऱ्यांची पसंती.यंदाही हरभऱ्याची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर झाली असून अनुकूल परिस्थिती पहाता यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत हरभऱ्याचे क्षेत्र कमीच आहे. गेल्यावर्षी ११ लाख ३७ हजार ६६० हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली असून आतापर्यंत दहा लाख ८५ हजार ५१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मका सोडली तर सर्वच पिकांच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता दिसून येत आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र नऊ लाख ७१ हजार ७६१ हेक्टर असून आतापर्यंत दहा लाख ८५ हजार ५१ हेक्टरवर (११२ टक्के) झाली आहे. त्यानंतर ज्वारीचीही पेरणी ९९ टक्के झाली असून.विभागात ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र तीन लाख ३६ हजार ९५६ हेक्टर असून आतापर्यंत तीन लाख ३३ हजार ५९२ हेक्टरवर ज्वारीच्या पेरण्या झाल्या आहेत. गव्हाच्या एक लाख ४९ हजार १७७ पैकी एकलाख ५८ हजार ३७ हेक्टरवर (१०५ टक्के) पेरणी झाली आहे. करडईच्या २२ हजार ६३७ हेक्टरपैकी २३ हजार ८२८हेक्टरवर (१०५ टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत..काही दिवसापासूनचे ढगाळ वातावरण हे नॉर्मल आहे. त्याचा रब्बीच्या पिकांवर काहीच परिणाम होणार नाही. उलट ज्वारीसाठी हे वातावरण पोषक आहे. ढगाळ वातावरण असले तरी ऊन पडत आहे. ढगाळ झाकाळलेले नाही. पाऊस पडलेले नाही. रब्बीचे पिके सध्या जोमदार असून अंतिम पेरणीचा अहवालापर्यंत आणखी क्षेत्रात आणखी वाढ होईल.- महेश तीर्थकर, प्रभारी कृषी सहसंचालक, लातूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.