Akola News: दीर्घकाळ रखडलेल्या रब्बी हंगामाने आता गती पकडण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांत वातावरणात झालेल्या अनुकूल बदलांमुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील एकूण रब्बी पेरणी आता २३ टक्क्यांवर पोचली आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सरासरी १ लाख २७ हजार ७२० हेक्टर अपेक्षित क्षेत्रांपैकी २९ हजार ८८ हेक्टरवर लागवड पूर्ण झाली आहे. यामध्ये हरभऱ्याची लागवड सर्वाधिक आहे..रब्बी हंगामात जिल्ह्यात गहू, हरभरा ही मुख्य पिके आहेत. त्यातही सर्वाधिक क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड केली जाते. यंदा हरभऱ्याची सरासरी १ लाख २,७३३ हेक्टर क्षेत्रापैकी २५ हजार ४२४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यामुळे हरभरा पिकाची लागवड २५ टक्क्यांवर पोचली असून शेतकऱ्यांचा याकडे मोठा कल दिसत आहे. दरम्यान गव्हाच्या लागवडीची गती तुलनेने मंद असून २३ हजार ६७७ हेक्टर सरासरीपैकी सध्या २३३१ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. गहू लागवड अद्याप १० टक्क्यांच्या घरात आहे..Rabi Sowing : रब्बी हंगामात ३ लाख ३९ हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित.रब्बी ज्वारी पिकाच्या पेरणीचाही वेग अजून थोडा मंद आहे. ज्वारीचे सरासरी १०७९ हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी १३६.४ हेक्टरवर लागवड झाली आहे, म्हणजेच अंदाजे १३ टक्के आहे. रब्बी कांदा आणि भाजीपाला पिकांनाही शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत असून अनुक्रमे ६९० आणि ४७६ हेक्टर क्षेत्रांवर या पिकांची लागवड झाली आहे..Crop Loan Distribution : सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात ५६० कोटींचे पीक कर्ज वितरण ; ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ .रब्बी पिकांची लागवड हळूहळू वाढत आहे. या महिना अखेर हरभऱ्याची बहुतांश लागवड आटोपण्याची चिन्हे आहेत. तर गव्हाची लागवड ही डिसेंबरमध्येही केल्या जाते. प्रकल्पांमधून आवर्तन मिळाल्यानंतर कोरडवाहू क्षेत्रात रब्बी लागवडीला सुरुवात होत असते. सध्या आवर्तने सुटलेली नसल्याने पेरण्यांची टक्केवारी कमी आहे. १५ डिसेंबरपर्यंत रब्बी पेरण्यांचा आकडा निश्चित वाढेल..पीकनिहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये)पीक सरासरी लागवड टक्केवारीरब्बी ज्वारी १०७९ १३६.४ १३गहू २३६७७ २३३१ १०हरभरा १०२७३३ २५४२४ २५रब्बी कांदा ०० ६९०भाजीपाला ०० ४७६एकूण १२७७२० २९०८८ २२.७८.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.