Nanded News: कृषी विभागाच्या माध्यमातून रब्बी हंगाम २०२५-२०२६ साठी शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे व पीक प्रात्याक्षीक योजनेतून प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यात रब्बी ज्वारी, हरभरा, गहू या पिकांच्या प्रकल्पाचा समावेश आहे. गट, कंपनीच्या शेतकऱ्यांनी महाडीबीटीवर अर्ज केले आहेत. .परंतु अद्याप याद्या तयार झाल्या नसल्यामुळे बियाणे वितरण रखडले आहे. तर प्रमाणित बियाणे वितरणात प्रथम येणाऱ्यास मिळणार प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली..Seed Subsidy : सेस फंडअंतर्गत ५० टक्के अनुदानावर बियाणे.जिल्ह्यात दरवर्षी शेतकऱ्यांना खरीप तसेच रब्बी हंगामात पेरणीसाठी बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येतात. यात यंदाही खरिपासह रब्बीमध्ये शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर मागणी नोंदविलेल्या शेतकऱ्यांना बियाणे वितरित करण्यात येणार आहे. हरभरा पिकांसाठी १० वर्षांतील वाणासाठी ५ हजार रुपये प्रति क्विंटल व १० वर्षांतील वाणांसाठी २ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात येणार आहे..याकरीता जिल्ह्यास १० वर्षांतील वाणांकरिता २१६० क्विंटल व १० वर्षांवरील वाणांकरिता २१८१ क्विंटल लक्ष्यांक प्राप्त झाला आहे. रब्बी ज्वारीच्या १० वर्षांतील वाणांसाठी ३ हजार रुपये प्रति क्विंटल व १० वर्षांवरील वाणांसाठी १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात येत आहे. जिल्ह्याकरिता १० वर्षांतील वाणांकरिता १०० क्विंटल व १० वर्षांवरील वाणांकरिता २६० क्विंटल लक्ष्यांक प्राप्त झाला आहे..Seed Subsidy Scheme : प्रमाणित बियाण्यांच्या खरेदीवर आता शेतकऱ्यांना थेट ५० % सवलत .प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रमांतर्गत अधिकृत वितरकांकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर लाभार्थी निवड करण्यात येत आहे. त्यासाठी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, आधार कार्ड, सातबारा उतारा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. दरम्यान जिल्ह्यात सध्या रब्बी पेरणीला सुरुवात झाली आहे. परंतु बियाणे वितरणाच्या कार्यक्रमाला जिल्ह्यात अद्याप गती आली नसल्यामुळे शेतकऱ्यांनी लवकर बियाणे वितरित करावे, अशी मागणी करत आहेत..यंदाही करडईचे बियाणे नाहीजिल्ह्यात दरवर्षी राष्ट्रीय खाद्यतेल अभियानात गळीतधान्य योजनेतर्गत करडईचे बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर वितरित करण्यात येत होते.कृषी विभागाने करडईच्या अनुदानित बियाणांचा कार्यक्रम तयार केला होता. परंतु करडईचे बियाणे उपलब्ध झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. मागील वर्षापासून शेतकऱ्यांना बाजारात मिळणाऱ्यांना करडई बियाणांवर अवलंबून राहावे लागणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.