Rabi Sowing Area Rises By 16.4 Lakh Hectares: यंदाच्या रब्बी हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक क्षेत्र पिकांनी व्यापले आहे. जानेवारीच्या २ तारखेपर्यंत देशभरात सुमारे ६३४ लाख हेक्टरवर रब्बी पीक क्षेत्र होते. या हंगामात रब्बी पीक क्षेत्रात चांगली वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात एकूण क्षेत्रात १६.४० लाख हेक्टरने वाढ झाली आहे. गहू पेरणी ३३४ लाख हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत गहू पीक क्षेत्रात ६ लाख हेक्टरने वाढ झाल्याचे दिसून आली आहे. तर भात पीक पेरणीने २.६७ लाख हेक्टरने आघाडी घेतली असल्याची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिली आहे. .गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील एकूण ६१७.७४ लाख हेक्टरच्या तुलनेत झालेली ही वाढ शेतीतून अधिक उत्पादनाला चालना देईल. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुधारणा होण्यास मदत करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. .कडधान्ये लागवडीतही वाढ झाली आहे. यंदा कडधान्ये पीक क्षेत्र १३४.३० लाख हेक्टरवर विस्तारले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १३०.८७ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा पीक क्षेत्र ३.४४ लाख हेक्टरने अधिक आहे. हरभरा पीक लागवड क्षेत्रात ४.६६ लाख हेक्टरने लक्षणीय वाढ झाली आहे. यंदा हरभरा पीक ९५.८८ लाख हेक्टरवर आहे..Rabi Jowar Sowing: मराठवाड्यात पाच लाख हेक्टरवर ज्वारीची पेरणी.कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार, ज्वारी, बाजरी आणि नाचणीसारख्या भरड धान्यांची पेरणी ५१.७९ लाख हेक्टरवर झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ५०.६६ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा भरडधान्यांखालील क्षेत्र १.१३ लाख हेक्टरने वाढले आहे. तेलबिया पीक ९६.३० लाख हेक्टरवर विस्तारले आहे. गेल्या वर्षाच्या याच कालावधीतील तेलबिया पीक क्षेत्र यंदा ३ लाख हेक्टरने वाढले आहे..Rabi Jowar Management: रब्बी ज्वारीवरील अमेरिकन लष्करी अळीचे व्यवस्थापन.मान्सून हंगामातील चांगल्या पावसामुळे रब्बी पीक क्षेत्र वाढले असल्याचे सांगितले जात आहे. सध्या देशातील काही भागात आता भुईमूग पेरणी सुरु झाली आहे. यामुळे एकूण रब्बी पीक क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.