Nagpur News : खरीप हंगाम संपत आला असून शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत. त्या अनुषंगाने कृषी विभागाने तयारी पूर्ण केली आहे. रब्बी हंगामात २ लाख ३ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. यात हरभरा आणि गहू पिकाचे क्षेत्र गतवर्षीच्या तुलनेत वाढणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. .जिल्ह्यात गतवर्षी रब्बी हंगामात १ लाख ९० हजार ९६.९ हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात लागवड क्षेत्रात १२ हजार हेक्टर पर्यंतची वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील १३ तालुक्यांत १ लाख ५६ हजार शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी विहिरीची व्यवस्था आहे..या व्यतिरिक्त कालव्याद्वारे पाण्याची व्यवस्था करून साधारण ६० हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचनाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात गहू पीक सरासरी ७७ हजार ३२२ हेक्टरवर घेतले जाते. गतवर्षी गहू लागवड क्षेत्र ९६ हजार ४१४ हेक्टरवर पोहोचले होते. त्या पार्श्वभूमीवर यंदाही गहू लागवड क्षेत्रात वाढीचा अंदाज असून हे क्षेत्र सुमारे दहा हजार 154 हेक्टरने वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे..Rabi Season: जमिनी वाफशाला; रब्बीची तयारी सुरू.त्या अनुषंगाने कृषी विभागाने यंदा १ लाख ६ हजार ५६८ हेक्टरवर गहू पीक लागवडीचे नियोजन केले आहे. हरभऱ्याखाली जिल्ह्यात ८३ हजार ६२५ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. गतवर्षी ९१ हजार ४४० हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली होती. तर यंदा यात वाढ होऊन हरभऱ्याचे क्षेत्र ९६ हजार हेक्टर वर जाईल असा अंदाज आहे..गळीत धान्य पिकांच्याही क्षेत्रात वाढजिल्ह्यात १३ तालुक्यापैंकी आठ तालुक्यात कमी अधिक प्रमाणात भात पिकाची लागवड केली जाते. मात्र बरेच शेतकरी धान पिकानंतर दुसरे पीक घेत नाही. सिंचनाची सुविधा असल्याने अशा शेतकऱ्यांना गळीत धान्य, जवस आणि मोहरी या पिकाकडे वळविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहे..Rabi Season: रब्बी हंगामासाठी पाऊस लाभदायक.त्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्याला किमान १० हेक्टर क्षेत्रावर गळीत धान्य लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. तर ज्या तालुक्यात ही पिके घेतली जातात अशा तालुक्यांना २० ते ३० हेक्टर वर लागवडीचे नियोजन केले आहे. गतवर्षी मोहरी पिकाची ८ हेक्टरवर तर जवस पिकाची ६९ हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. जवस पिकाची सरासरीपेक्षा अधिक लागवड झाल्याने यंदा लागवड नियोजनात वाढ केली आहे..२०२४-२५ मधी लागवड क्षेत्र व २०२५ मध्ये प्रस्तावित क्षेत्रतृणधान्य ९६४१४ १०६५६८कडधान्य ९१४४० ९६०००गळीतधान्य ७४५.५५ ४००रब्बी नियोजन तालुकानिहाय (हेक्टरमध्ये)तालुका हरभरा गहूनागपूर ४६०० २२४४कामठी ८८०० ५८०४हिंगणा १५०० १९७१सावनेर १२०० ५६४९काटोल ५८०० २६८५१कळमेश्वर ३८०० २५५७नरखेड ७७०० ६७४९रामटेक २३०० १३४३पारशिवनी १८०० ६९६८मौदा ५२०० ३३८११उमरेड १५००० ३२४३कुही १८२०० ६३१३भिवापूर २०१०० ३०६५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.