Farm Electricity: आगामी रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अखंड आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी राज्य शासनाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. वाशीम-मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघासाठी १०० केव्हीए क्षमतेची १५० नवीन रोहित्रे उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती आमदार श्याम खोडे यांनी दिली..रब्बी हंगामात सिंचनासाठी विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र, कमी क्षमतेची रोहित्रे, वारंवार जळणारे ट्रान्सफॉर्मर आणि प्रलंबित वीजजोडण्या यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर आमदार श्याम खोडे यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मतदारसंघातील वीज समस्येकडे लक्ष वेधले..Agriculture Electricity: २०२७ पर्यंत सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना दिवसा वीज, राजस्थान सरकारची महत्त्वाची योजना.रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वीच आवश्यक उपाययोजना करून वीजपुरवठा सक्षम करण्याची मागणी त्यांनी केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी वापरण्यात येणाऱ्या ६५ केव्हीए क्षमतेच्या रोहित्रांऐवजी अधिक क्षमतेची १०० केव्हीएची १५० नवीन रोहित्रे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला..Agriculture Electricity: मोठा दिलासा! १२५ गावांतील शेतकऱ्यांना दिवसा वीज.या नवीन रोहित्रांमुळे वीजभार अधिक प्रभावीपणे पेलला जाणार असून वारंवार होणारे बिघाड कमी होण्यास मदत मिळेल. परिणामी शेतीपंपांना अधिक नियमित वीजपुरवठा होऊन रब्बी हंगामातील सिंचन सुरळीत राहण्यास हातभार लागणार आहे..याशिवाय, शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषी वीजजोडण्या तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधित महावितरण अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात येणार असल्याचेही आमदार खोडे यांनी सांगितले. या निर्णयामुळे आगामी रब्बी हंगामात मतदारसंघातील शेतकऱ्यांना वीजटंचाईचा सामना करावा लागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.