Jalna News: अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेला. अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती आणि रोगराईमुळे शेतातील उभ्या पिकांची मोठी हानी झाली. मोसंबी आणि सीताफळाला बाजारात कवडीमोल भाव मिळाला. अनेक शेतकऱ्यांचा फळ तोडणी व वाहतूक खर्चही वसूल झाला नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मोसंबी व सीताफळ बागा उद्ध्वस्त होत असल्याने अखेर फळबागांचे सरपण होत आहे..दरम्यान, रब्बी हंगाम जोमात आहे. अंबड तालुक्यातील परतीच्या पावसामुळे शेतशिवारातील ओढे, नाले व नद्या पाण्याने खळखळ वाहत आहेत..Rabi Season: बळीराजाला आता रब्बीतून उभारीची आशा.विहिरी तुडुंब भरल्या आहेत. तसेच कूपनलिका, पाझर तलाव आणि लघु तलावही तुडुंब भरले आहेत. या मुबलक जलसाठ्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील शाळू ज्वारी, गहू, हरभरा पिकांना पाणी देण्यासाठी सोय झाली आहे..Rabi Season: धाराशिवमध्ये ज्वारीही डोलू लागली, हरभऱ्याने बहरले रान.खरीप हंगाम हातचा गेला. केलेला खर्चही वसूल झाला नाही. मात्र, रब्बी हंगामातील पिके जोमात आहे. यामुळे चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकरी बाळगून आहे.-उद्धवराव शिंदे, शेतकरी, लालवाडी.फळगळतीचे प्रमाण, काळा डाग व कवडीमोल भावामुळे मोसंबीची बाग जेसीबीने उखडून टाकली. कुऱ्हाड चालवित सरपण केले. मुबलक जलसाठा उपलब्ध झाल्याने उसाची लागवड केली.-भगीरथ खांडेकर, शेतकरी, धनगरपिंपरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.