Rabi Cultivation: बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची लागवड अंतिम टप्प्यात
Rabi Season: बुलडाणा जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीने मागील काही दिवसांत वेग घेतला असून एकूण लागवड क्षेत्र ८३ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. अनुकूल हवामान, जमिनीत उपलब्ध ओलावा यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पिकांकडे पुन्हा एकदा आशेने पाहिले आहे.