Yavatmal News: रब्बी हंगाम ऐन भरात असताना तालुक्यातील शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे विहिरी, बोअरवेल व नाल्यांद्वारे पाण्याची मुबलक सोय आहे; मात्र वीजपुरवठाच नियमित नसल्याने पाणी असूनही पिकांना वेळेवर ओलित देता येत नाही. आठवड्यातून केवळ तीन दिवस मिळणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे रब्बी पिके धोक्यात आली आहेत..यंदा अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन व तूर या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यानंतर नोव्हेंबरपर्यंत पावसाची हजेरी कायम राहिल्याने नुकसान आणखी वाढले. या तोट्याची भरपाई करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी रब्बीत गहू, हरभरा, मूग व ज्वारीची पेरणी केली..Agriculture Electricity: शेतकऱ्यांना विजेपासून वंचित ठेवणे वैयक्तिक स्वातंत्र्याचा भंग.मात्र, पिके जोमात असतानाच विजेअभावी सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. अतिवृष्टीमुळे जलस्रोत भरले असले, तरी वीज आठवड्यातून केवळ तीन दिवस उपलब्ध होत असल्याने सिंचनाचे नियोजन कोलमडले आहे. काही शेतकरी रात्रीच्या वेळी ओलित करत आहेत; मात्र त्या वेळी हिंस्र प्राण्यांचा धोका असल्याने जीव धोक्यात घालून शेती करावी लागत आहे. त्यामुळे नियमित वीजपुरवठ्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे..Electricity Bill Issue: वीज बिलातील वाढीव दरांविरोधात शिवसेनेचे संभाजीनगर मुख्य अभियंत्यांना निवेदन.‘‘दहा एकरातील संपूर्ण कापूस व सोयाबीन पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले. ते भरून काढण्यासाठी रब्बीत गहू व हरभऱ्याची पेरणी केली; मात्र पीक जोमात असताना वारंवार वीज खंडित होत असल्याने ओलिताचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.’’श्रीनिवास रेकुलवार, शेतकरी.“सातही दिवस वीजपुरवठा व्हावा, यासाठी घोन्सी येथे सात मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यापैकी पाच मेगावॅट वीज पांढरकवडा उपकेंद्राला कार्यान्वित झाली असून उर्वरित दोन मेगावॅट वीज पहापळ उपकेंद्राशी लवकरच जोडण्यात येणार आहे.”नरेंद्र कटारे, कार्यकारी अभियंता, पांढरकवडा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.