Parbhani News: जिंतूर तालुक्यात सध्या रब्बी पिके जोमात आहेत. काही भागात ज्वारी हुरड्यात येत असून हरभऱ्याचे पीक पक्वतेला आल्याने बाजारात हरभऱ्याचे डहाळे विक्रीस येत आहेत. .तालुक्यात मुरमाड, मध्यम व सुपीक अशी तीन प्रकारची शेतजमीन आहे. रब्बी हंगामातील पीक लागवडीयोग्य क्षेत्र ५२११८.१३ हेक्टर असून यामध्ये प्रामुख्याने गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई व इतर पिके घेतली जातात. सुरवातीला पाऊस उशिरा झाला..Rabi Season: मुबलक जलसाठ्यामुळे रब्बी हंगाम जोमात.नंतर मोठ्या प्रमाणात अनेकदा अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप पिकांना फटका बसला. शिवाय रब्बी पिकांची पेरणी जमिनीच्या प्रतीनुसार मागेपुढे झाल्या. त्यामुळे कुठे पिके पक्वतेला येताहेत, तर कुठे जोमाने वाढताहेत. एकंदरीत सध्याच्या पोषक वातावरणामुळे पीकपरिस्थिती.Rabi Season: खरिपानंतर शेतकऱ्यांची आता रब्बीवर भिस्त.Rabi Seasonसमाधानकारक आहे; परंतु या आठवड्यात वातावरणातकमालीचा गारठा जाणवत असल्याने काही पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होतो आहे. तालुक्यात पूर्वहंगामी म्हणून उसाचे पीक घेतले जाते. या पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र असून ५८ हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड करण्यात आली असल्याचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे सांगितले..हरभऱ्याची १०० टक्के पेरणीहरभरा पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र २९८०३ हेक्टर असताना १००.३९ टक्के पेरणी झाली असून, सध्या पीक फुलोऱ्यात आहे. त्याखालोखाल ज्वारी लागवडीचे उद्दिष्ट १५७०२ हेक्टर असून, पेरणी ९९.९५ टक्के झाली. याप्रमाणेच गव्हाची पेर ९९.६६ टक्के झाली असून काही भागांत पीक ओंब्याच्या स्थितीत आहे. काही ठिकाणी ज्वारी हुरड्यात येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.