Ahilyanagar News : जिल्ह्यात यंदा रब्बीत ४ लाख ९२ हजार ०७९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज गृहीत धरुन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नियोजन केले आहे. ज्वारीचे २ लाख ६७ हजार ८३४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. मात्र यंदा १ लाख ६४ हजार ०४२ हेक्टरवर पेरणी होईल त्यानुसार बियाणे नियोजन केले आहे. .त्यामुळे ज्वारीचे यंदाही सरासरीपेक्षा एक लाख हेक्टरवर पेरणी कमी होण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी दीड लाख हेक्टरवर ज्वारी पेरली गेली होती. अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बीचे ४ लाख ७५ हजार १२५ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. गेल्यावर्षी ४ लाख ४७ हजार ३४२ हेक्टरवर पेरणी झाली होती. .Rabi Crop Management: शाश्वत रब्बी पीक उत्पादनासाठी मृद् व जलसंधारण.त्यावर आधारित ४ लाख ९२ हजार ०७९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज गृहीत धरुन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नियोजन केले आहे. रब्बीत ज्वारी प्रमुख पीक मानले जाते. ज्वारीचे सरासरी २ लाख ६७ हजार ८३४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. .मात्र गेल्या काही वर्षांपासून ज्वारीचे क्षेत्र वरचेवर कमी होत आहे. गेल्यावर्षी १ लाख ४९ हजार १२८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यानुसार यंदा १ लाख ६४ हजार ०४२ हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज गृहीत धरुन बियाणे मागणीचे नियोजन केले आहे..Rabi Crop Demonstrations: रब्बीत पाच हजार हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके.यंदा ज्वारीचे २ हजार ८७१ क्विंटल बियाणे मागणी केली आहे. रब्बीसाठी एकूण १ लाख ६०३ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. महाबीज ३ हजार २५४ क्विटंल बियाणे पुरवठा करणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील मोहीम अधिकारी नीलेश अभंग यांनी सांगितले..रब्बीत बियाणे, खते व अन्य निविष्ठांची कमतरता भासणार नाही. चढ्या दराने विक्री झाल्याचे निदर्शनात आल्यास कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाच्या पथकाने दिला आहे.बियाणे मागणी (क्विंटल)ज्वारी ४१०१गहु ६१,१९६हरभरा २६,५५८सूर्यफूल ५करडई १९मका ८७२४.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.